AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Drugs Connection | एनसीबी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा दावा, क्षितीज प्रसादचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

क्षितीज अद्याप तुरुंगात असून, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. विशेष न्यायालयाकडे पुन्हा एकदा जामीन अर्ज सादर केला आहे.

Bollywood Drugs Connection | एनसीबी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा दावा, क्षितीज प्रसादचा पुन्हा जामिनासाठी अर्ज
| Updated on: Oct 13, 2020 | 4:41 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात (Drugs Connection) एनसीबीकडून ‘धर्मा प्रोडक्शन’चा संचालक निर्माता क्षितीज प्रसादला (Kshitij Prasad) अटक करण्यात आली होती. या प्रकरणात क्षितीज अद्याप तुरुंगात असून, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. सोमवारी (12 ऑक्टोबर) क्षितीजने विशेष न्यायालयाकडे पुन्हा एकदा जामीन अर्ज सादर केला आहे. या याचिकेत त्याने एनसीबी अधिकाऱ्यांनी आपल्याला या प्रकरणात अडकवले, असा दावा केला आहे. (Bollywood Drugs Connection update Kshitij Prasad appeals plea for bail)

एनसीबीने 26 सप्टेंबर रोजी क्षितीज प्रसादला अटक केली होती. त्याआधी एनसीबीने सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि काही लोकांना याप्रकरणी ताब्यात घेतले होते. या सर्वांवर नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अर्थात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातून रिया चक्रवर्तीला सध्या जामीन मंजूर झाला आहे.

एनसीबी अधिकारी या प्रकरणात अडकवत असल्याचा दावा

क्षितीज प्रसादने विशेष न्यायालयाकडे दाखल केलेल्या जामीन याचिकेत एनसीबी अधिकारी आपल्यावर दबाव आणून, खोटी नावे घेण्यास सांगत आहेत. मी नकार दिल्याने ते मला या प्रकरणात अडकवत आहेत, असा दावा त्याने केला आहे. या आधी रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनीदेखील असाच दावा केला होता. (Bollywood Drugs Connection update Kshitij Prasad appeals plea for bail)

सतिश मानेशिंदे याचा दावा

एनसीबी कोठडीत क्षितीजचा छळ होत असून, धर्मा प्रोडक्शनशी संबधितांची आणि इतर बड्या कलाकारांची नावे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा सतिश मानेशिंदे यांनी केला होता. ‘न्यायाधिशांसमोर क्षितीजचा जबाब नोंदवण्यात आला. एनसीबी कोठडीत क्षितीजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले आहे. क्षितीजच्या घरातून सिगारेटची थोटके मिळाली होती. पण, एनसीबीने जबरदस्तीने त्याला गांजाचे नाव दिले. ईशा आणि अनुभवला क्षितीजविरोधात जबाब द्यायला लावला’, असे वकील सतिश मानेशिंदे यांनी म्हटले होते.

…तर तुला सोडून देऊ!

अटक केल्यानंतर पहिल्या दिवशी एनसीबी कोठडीत क्षितीजला चांगली वागणूक दिली गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी क्षितीजचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली तेव्हा, समीर वानखेडेंसह इतर अधिकारी तिथे उपस्थित होते. क्षितीज प्रसाद धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्याने त्याने करण जोहर, सोमल मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज यांनीही ड्रग्ज घेतले असे कबूल करावे, तर त्याला सोडून देण्यात येईल, असे क्षितीजला सांगण्यात आले. त्याने या गोष्टीस नकार दिल्यावर त्याच्याकडून जबरदस्तीने वदवून घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा सतिश मानेशिंदे यांनी केला होता.

संबंधित बातम्या : 

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

ड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप

‘धर्मा प्रोडक्‍शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

(Bollywood Drugs Connection update Kshitij Prasad appeals plea for bail)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.