व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

तपास सुरु असल्यामुळे अभिनेत्रींना शिक्षा होईल की नाही, असे सांगता येणार नाही. हा तपासाचा भाग असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

जळगाव : व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बड्या अभिनेत्रींना समन्स बजावले आहे. याविषयी भाष्य करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही’ असे मत व्यक्त केले. (Special public prosecutor Ujjwal Nikam tells if WhatsApp Chat can be a proof in Bollywood Drugs Connection)

व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यासारख्या बड्या अभिनेत्रींना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यांचे चॅटिंग किंवा मेसेज एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्या आधारे या अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणात अडकू शकतात का? हा पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरला जाऊ शकेल का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग किंवा मेसेजस हा उत्तम पुरावा होऊ शकत नाही. यासाठी एनसीबीला आणखी पुरावे शोधावे लागतील. परंतु अनेक ड्रग्ज पुरवणाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असल्याचे समोर आले असल्याने व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मेसेज हे महत्त्वाचे पुरावे ठरु शकतात’

‘या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स दिला आहे कारण या प्रकरणाबाबत त्यांना अधिक पुरावे जमा करुन या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येईल. आणखी तपास सुरु असल्यामुळे त्यांना शिक्षा होईल की नाही, असे सांगता येणार नाही. हा तपासाचा भाग असल्याचे यावेळी निकम म्हणाले.

रकुलने अखेर समन्स स्वीकारलं

दरम्यान, चौकशी टाळण्यासाठी समन्स मिळालेच नाहीत, असा बहाणा करणाऱ्या अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आहे. समन्स स्वीकारत तिने आपला नवा पत्ता एनसीबी अधिकाऱ्यांना दिला आहे. दीपिका पदुकोणसह शुक्रवारी (25 सप्टेंबर) तिची चौकशी होणार आहे.

फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांना आज (24 सप्टेंबर) एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापैकी सिमॉन खंबाटा सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली. (Special public prosecutor Ujjwal Nikam tells if WhatsApp Chat can be a proof in Bollywood Drugs Connection)

सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण दुपारी मुंबईत परतली, तर सुट्टी घालवण्यासाठी आपल्या आई अभिनेत्री अमृता सिंह यांच्यासह गोव्यातील घरी गेलेली सारा अली खानही मुंबईत आली.

कोणाची कधी चौकशी होणार?

25 सप्टेंबर- दीपिका पदुकोण
25 सप्टेंबर- रकुल प्रीत सिंग
26 सप्टेंबर- सारा अली खान
26 सप्टेंबर- श्रद्धा कपूर

संबंधित बातम्या 

बहाणेबाजी संपली, रकुल प्रीत सिंह एनसीबीसमोर हजर राहणार

एनसीबी समन्सनंतर दीपिका चार्टर्ड विमानाने मुंबईला, रणवीरही टेंशनमध्ये

(Special public prosecutor Ujjwal Nikam tells if WhatsApp Chat can be a proof in Bollywood Drugs Connection)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *