पोलीस तपासात मदत करणाऱ्या तरुणाची हत्या, 8 तासात छडा लावला

मुंबईतील मालवणी परिसरात एका 27 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे (Murder in Malvani).

पोलीस तपासात मदत करणाऱ्या तरुणाची हत्या, 8 तासात छडा लावला
सचिन पाटील

| Edited By:

Oct 13, 2020 | 8:23 AM

मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरात एका 27 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे (Murder in Malvani). सात जणांनी मिळून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत मुलाने दोन दिवसांपूर्वी एक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवला म्हणून त्याची हत्या करण्यात आली (Murder in Malvani).

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबरला संध्याकाळी मालवणी गेट नंबर 6 जवळ नजीर उर्फ कालू सुल्तान शेख नावाच्या एका 27 वर्षीय तरुणाला सात जणांणी मिळून त्याची हत्या केली.

घटनास्थळी 9 ऑक्टोबरला मारामारी झाली होती. त्याची चौकशी मालवणी पोलीस करत होते. यावेळी पोलिसांना मृत मुलाने मारामारीचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवला होता. त्यामुळे रागवलेल्या एकाच परिवारातील सात जणांनी मिळून नजीर शेखला मारहाण केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितले.

मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील एकाच परिवारातील 7 जणांना अटक करण्यात आली आहे. शाहनवाज लियाकत कुरेशी, शाहरूख कुरेशी, छोटू कुरेशी, रमज़ान कुरेशी, नदीम मलिक, जायदा मलिक, फरीदा खान अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत.

संबंधित बातम्या :

TRP Scam : एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक, Republic TV च्या अधिकाऱ्यांची उद्या चौकशी

पुण्यातील सराफाची दुकाने फोडणारी टोळी गजाआड; एक कोटी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें