पुण्यात लॉजवर अल्पवयीन प्रेयसीची हत्या, प्रियकर पसार

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये लॉजवर अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी प्रियकर पसार झाला. हा लॉज भाजप पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती आहे

पुण्यात लॉजवर अल्पवयीन प्रेयसीची हत्या, प्रियकर पसार
Follow us
| Updated on: Sep 05, 2019 | 10:01 AM

पुणे : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन प्रेयसीची हत्या (Pune Girl Murder) करुन प्रियकर पसार झाला आहे. पुणे जिल्ह्यात मावळमधील वडगाव एमआयडीसी रोडवर (Wadgaon MIDC Road) असलेल्या लॉजवर हा धक्कादायक प्रकार घडला.

विशाल लॉन्सजवळ असलेल्या ‘निसर्गवारा स्पॉट ऑन’ लॉजवर बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक जोडपं आलं. ते जोडपे लॉजमधील रुम नंबर 303 मध्ये थांबलं होतं.

काही कारणाने झालेल्या वादातून जोडप्यातील तरुणाने तरुणीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार केले, यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी श्रीराम गिरी लॉजमधून पळून गेला. मयत तरुणी अल्पवयीन असल्याचं समोर आलं.

आरोपीच्या शोधात पुणे ग्रामीण पोलिसांची सहा पथकं रवाना करण्यात आली आहेत. लॉजवरही कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सूचित केलं. तरुणी अल्पवयीन असताना तिला एका तरुणासोबत लॉजमध्ये जाऊ कसं दिलं, आयकार्ड तपासलं नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मावळमध्ये असलेला ‘निसर्गवारा स्पॉट ऑन’ हा लॉज भाजप पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती आहे. गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर आणलं आणि तिच्यावर अत्याचार केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हत्याकांडामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.