सांगली ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील आणखी 5 मृतदेह हाती, मृतांचा आकडा 17 वर

पलूसमधील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.  गुरुवारी 8 ऑगस्टला ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मोठा अपघात झाला होता

सांगली ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील आणखी 5 मृतदेह हाती, मृतांचा आकडा 17 वर
सांगली बोट दुर्घटना
Follow us
| Updated on: Aug 10, 2019 | 1:52 PM

Brahmanal Boat Overturn सांगली : पलूसमधील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.  गुरुवारी 8 ऑगस्टला ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेनंतर नेमके किती लोक वाहून गेलेत याचाच नेमका आकडा माहीत नाही.  अपघाता दिवशी 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अपघाताच्या दिवशी  9 मृतदेहच सापडले होते. मग दुसऱ्या दिवशी 3 मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर आज शनिवारी 5 मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.

सांगलीमध्ये महापूर (Sangli Flood) आल्यामुळे थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ब्रह्मनाळ या गावात बोट उलटून (Brahmanal Boat Overturn) अनेकांचा मृत्यू झाला होता. ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली. बुडालेली बोट ग्रामपंचायतीची होती.

PHOTO : बुडालेल्या बोटीचे फोटो, चिखलाने भरलेलं गाव, कसं आहे ब्रह्मनाळ?

सांगलीतील 4 तालुक्यांना पुराचा वेढा आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पाणी शिरलं होतं. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यामुळे बोटीला दुर्घटना झाली.

नेमकं काय घडलं?

नदीपात्रापासून दीड किलोमीटरपर्यंत 15 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. ब्रह्मनाळमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होतं. ब्रह्मनाळ आणि वसगडे या गावांचा प्रवास ग्रामपंचायतीची  नावेने केला जातो.  वर्षभर इथली वाहतूक अशाच पद्धतीने होते. पुरामुळे या भागात सध्या वीजेचे खांब, मोठ मोठी झाडं शेंड्यापर्यंत बुडाली आहेत. त्यामुळे नेमकी बोट कुठल्या दिशेने न्यायची हेच लक्षात आलं नसावं. ग्रामपंचायतीच्या  बोटीतून नेहमी वाहतूक होत असली तरी पुराच्या पाण्याने मार्ग समजण्यास अडथळा येत होता.

मंदीर, झाड, कठडे पाहून अंदाजाने मार्गक्रमण सुरु होते.त्यावेळी बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात पलटी झाली. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. खासगी बोटीत तशी व्यवस्थाच नव्हती. नियमित सवयीप्रमाणे ही बोट नेली जात होती.

पाण्याची स्थिती इतकी भीषण आहे की बोट पलटी होताच अनेक जण वाहून गेले. मोठी झाडं पाण्यात गेलेत, वीजेचे खांब पाण्यात गेलेत त्यामुळे जायचं कुठं हेच कळत नव्हतं.  बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला आणि बोट पलटली.

संबंधित बातम्या  

Sangli Boat Overturn | काईलीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले,घटनास्थळी काय घडलं?

Sangli Boat Overturn : सांगली बोट दुर्घटना : बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला, बोट पलटली, नेमकं काय झालं?

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू  

PHOTO : बुडालेल्या बोटीचे फोटो, चिखलाने भरलेलं गाव, कसं आहे ब्रह्मनाळ? 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.