Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 9:05 PM

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला” date=”16/05/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

अणुऊर्जा

  • अणुऊर्जा क्षेत्रातही ठोस सुधारणांची घोषणा, रिसर्च रिअॅक्टर PPP मॉडेलवर उभारणार,
  • वैद्यकीय हेतूंसाठी PPP रिसर्च रिअॅक्टर
  • भाजीपाला,फळे टिकवण्यासाठी किरणोत्सार तंत्रज्ञान
  • खाद्य संरक्षण केंद्रे उभारुन नाशवंत माल टिकवणार

वीज

  • सामाजिक पायाभूत सुधारणांसाठी 8100 कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुधारणा क्षेत्रात खाजगीकरण
  • केंद्रशासित प्रदेशांमध्ये वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणार, त्यामुळे वीज उत्पादनाला चालना मिळेल
  • लोडशेडींग करणा-या कंपन्यांना दंड आकारणार
  • वीजनिर्मितीत अधिकाधिक सातत्य ठेवणार, स्मार्ट प्री-पेड मीटर बसवणार

उपग्रह

  • अवकाश क्षेत्रात खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन, इस्रोच्या सुविधा खाजगी क्षेत्रासही देणार
  • खाजगी क्षेत्राला उपग्रह सोडता येणार,खाजगी क्षेत्रास अवकाश मोहिमा आखता येणार

हवाई क्षेत्र

  • विमानतळांचा PPP मॉडेलद्वारे विकास, 6 पैकी 3 विमानतळे यापूर्वीच विकसित, 540 कोटीऐवजी सध्या 1 हजार कोटी मिळतात, दुस-या टप्प्यात 6 विमानतळांचा PPP द्वारे विकास,  12 विमानतळात 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, तिस-या टप्प्यात 6 विमानतळांचा विकास
  • भारतीय हवाई हद्दीचा वापर स्वस्त होणार, हवाई हद्द स्वस्त केल्याने वर्षाला 1 हजार कोटी मिळतील, दोन महिन्यांत हवाई हद्द वापर स्वस्त होईल

संरक्षण क्षेत्र

  • शस्त्र कारखान्यांचे कामही कंपन्यांसारखे चालवणार, शस्त्र कारखान्यांचे खाजगीकरण नाही, निर्धारित वेळेतच कुठलीही शस्त्रास्त्र खरेदी करणार
  • संरक्षण साहित्यनिर्मितीतील FDI मर्यादा वाढवली, संरक्षण साहित्यात आता 74% FDI, सध्या संरक्षण साहित्यात 49% FDI मर्यादा
  • देशात बनतील अशा साहित्याची आयात नाही, लष्कराशी बोलूनच आयातबंदीचा निर्णय घेतला
  • काही संरक्षण साहित्याची आयात रोखणार, आयातबंदी असलेल्या संरक्षण साहित्याची यादी बनवणार, यादीतील साहित्य देशातच खरेदी होणार

कोळसा आणि खनिज उद्योग

  • अॅल्युमिनियमसाठी बॉक्साइट-कोळसा खाणींचा संयुक्त लिलाव
  • कोळसा आयात कमी करणार, कोळसा खाणींचे जाहीर लिलाव होणार, खनिज क्षेत्रात धोरणात्मक बदल
  • 500 खाणींचा लिलाव होणार, खासगी क्षेत्राला परवानगी, कोळशाद्वारे गॅसनिर्मितीवर भर
  • खनिज क्षेत्रातही मोठ्या सुधारणा करणार, उत्खनन, लिलाव, प्रक्रिया सर्व एकालाच करता येणार
  • कोळसा क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचे पॅकेज, कोळसा क्षेत्रातली सरकारची मक्तेदारी संपली, कोळसा खाणीच्या व्यावसायिक उत्खननाला परवागनी, कोळसा खाणींचे लिलाव करणार

उद्योग आणि गुंतवणूक

  • FDI च्या गुंतवणुकीला अजून वेग देणार, गुंतवणूक आकर्षणाच्या निष्कर्षावर राज्यांची यादी
  • हवाई, विमानतळे, MRO क्षेत्रासाठी आज पॅकेज
  • 8 विविध क्षेत्रांसाठी आज घोषणा, कोळसा, खनीज, संरक्षण उत्पादन, हवाई, वितरण कंपन्या, अवकाश क्षेत्रासाठी पॅकेज
  • उद्योगांसाठी 5 लाख हेक्टर जमीन तयार, 3378 सेझ आणि उद्योगक्षेत्रात जमीन उपलब्ध
  • चँपियन सेक्टरसाठी प्रोत्साहन पॅकेज देणार
  • गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार,देशात उद्योग अनुकूल वातावरण बनवणार
  • मोदी म्हणाले, तीव्र स्पर्धेसाठी तयार राहा, आत्मनिर्भरतेमुळे जागतिक आव्हाने पेलता येतील
  • पंतप्रधान मोदी सुधारणांना नेहमीच अनुकूल, आजचे पॅकेज व्यवस्थेतील सुधारणांसाठी

[svt-event title=”निर्मला सीतारमन यांची पत्रकार परिषद” date=”16/05/2020,4:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊन समजुतीने, अत्यंत काळजी घेऊन उठवावा लागेल- राहुल गांधी” date=”16/05/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मजूर आणि शेतकऱ्यांना किमान तात्पुरता दिलासा आवश्यक आहे – राहुल गांधी ” date=”16/05/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय, ते संकटात आहेत, त्यांना आधार द्या – राहुल” date=”16/05/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही – राहुल गांधी” date=”16/05/2020,12:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचं हाल : राहुल गांधी ” date=”16/05/2020,12:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जालन्यात आणखी दोन नव्या रुग्णांची भर” date=”16/05/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] जालनामध्ये आज आणखी दोन नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सात रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांनी सुट्टी देण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात 7 नवे कोरोना रुग्ण” date=”16/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात 7 नवे कोरोना रुग्ण एकाच दिवशी आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 36 वर पोहोचली आहे. पुणे-मुंबईमधून येणाऱ्या लोकांमुळे कोल्हापूरातील धोका वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 9 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसात 74 रुग्ण कोरोनामुक्त ” date=”16/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसात 74 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवशी मेयोतून सर्वाधिक 53 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली 193 वर पोहोचली आहे. नागपुरात काल 18 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 336 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ” date=”16/05/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 865 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये कोरोनाचे 18 नवे कोरोना रुग्ण” date=”16/05/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये कोरोनाचे 18 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. नांदेडमध्ये एकूण रुग्ण संख्या 84 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या 18 पैकी 13 जण प्रवाशी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यामध्ये 12 तासात 62 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ” date=”16/05/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासात एकूण 62 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3629 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 186 मृत रुग्ण आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचे 17 नवे रुग्ण” date=”16/05/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाचे 17 नवे रुग्ण आढळले आहेत. 10 पुरुष आणि 7 स्त्रीयांचा यामध्ये समावेश आहे. सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 360 वर पोहोचली आहे. तर 24 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”16/05/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.