Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे.

Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

लखनऊ: उत्तर प्रदेशातील हाथसर आणि बलरापूर येथे दोन तरुणींवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ( Mayawati seeks President’s rule in Uttar Pradesh)

मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी किमान उत्तर प्रदेशाकडे तरी लक्ष द्यावे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशात जंगल राज: देशमुख

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही उत्तर प्रदेशातील घटनेवरून राज्यातील योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हाथरसपाठोपाठ बलरामपूर येथे झालेली घटना दुर्देवी असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पीडित मुलीचा एफआयआरही नोंदवला गेलेला नाही. अंत्यसंस्काराला घरच्या लोकांनाही जाऊ दिले नाही. हा प्रकार अत्यंत अमानुष असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यात लक्ष घालावे, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसकडे निघाले आहेत. त्यांना अडवण्यात आले असून पीडित कुटुंबीयांची भेट घेऊ दिली जात नाही. राष्ट्रीय नेत्यांना अशा पद्धतीनं रोखणं अत्यंत दुर्देवी आहे, अशी टीकाही त्यांनी केलं आहे. ( Mayawati seeks President’s rule in Uttar Pradesh)

राहुल-प्रियांका गांधी हाथरसकडे पायी निघाले

दरम्यान, पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निघाले असता हाथरसमध्ये १४४ कलम लागू केल्याचं निमित्त करून यमुना एक्सप्रेसवेवर अडवण्यात आले. राहुल आणि प्रियांका यांची गाडी अडवल्यानंतर त्यांनी हाथरसकडे पायीच जाण्यास सुरुवात केली आहे. चार दिवस लागले तरी चालतील आम्ही हाथरसला पायीच जाऊ, असं राहुल आणि प्रियांका यांनी स्पष्ट केलं असून त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्तेही आहेत. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठिमार सुरू केल्याने येथील वातावरण चिघळले आहे.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींसह प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना, पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

UP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

( Mayawati seeks President’s rule in Uttar Pradesh)

Published On - 2:50 pm, Thu, 1 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI