AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त झालेल्या काही लोकांना तात्काळ उपचार मिळाले आहेत. (Car accident, Rohit Pawar rescued farmer )

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं
| Updated on: Nov 18, 2020 | 7:21 PM
Share

सांगली: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त झालेल्या काही लोकांना तात्काळ उपचार मिळाले आहेत. अपघात झाल्यामुळे रस्त्याच्याकडेला खड्ड्यात गेलेली ओमनी कार रोहित पवार यांच्या नजरेस पडली. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून खड्ड्यात गेलेल्या या ओमनी कारला धक्का मारत बाहेर काढण्यास मदत केली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळाले. (Car accident, Rohit Pawar rescued farmer )

रोहित पवार हे माण तालुक्यातील मांडवे-पिंगळी येथेून जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला एका शेतकऱ्याच्या ओमनी कारला अपघात झाल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही ओमनी कार खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली. ओमनी कार बाहेर काढल्यानंतर त्यांनी तात्काळ अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळू शकले.

रोहित पवार यांनी त्यानंतर ट्विट करून या अपघाताची माहिती देतानाच अशा अपघाताच्या प्रसंगी मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचं आवाहनही केलं आहे. पोलीस चौकशीला घाबरून अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये, असं ट्विट पवार यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

राजकारणात चहा विकल्याचंही भांडवल केलं जातं; रोहित पवारांचा खोचक टोला

पाडव्याला मंदिरं पुन्हा खुली, रोहित पवार ग्रामदैवत गोदड महाराजांच्या दर्शनाला

बिहारमध्ये नितीश कुमारांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झाले: रोहित पवार

(Car accident, Rohit Pawar rescued farmer )

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.