शहीद पतीच्या स्मारकासोबत सेल्फी घेत लग्नाचा वाढदिवस साजरा

शहीद पतीच्या स्मारकासोबत सेल्फी घेत लग्नाचा वाढदिवस साजरा

नवी दिल्ली : शहीद पतीसोबत सेल्फी घेतानाचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी या फोटोला सॅल्यूट केला आहे. आपल्या शहीद पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना शहीद कर्नल मुनेंद्र नाथ राय यांची पत्नी प्रियंका यांनी थेट स्मारकासोबत सेल्फी घेतला. कर्नल मुनेंद्र नाथ राय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढत असताना शहीद झाले.

लग्नाचा 18 व्या वाढदिवशी शहीद कर्नल मुनेंद्र नाथ यांची पत्नी प्रियांका या खूप भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी स्मारकासोबत सेल्फी काढत आपल्या लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा केला. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर ‘जय हिंद’ आणि ‘सॅल्यूट’ अशा कमेंटचा पाऊस पडत आहे.

शहीद कर्नल मुनेंद्र नाथ यांना 26 जानेवारी रोजी वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  मात्र दुसऱ्याच दिवशी 27 जानेवारी 2015 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. कर्नल मुनेंद्र नाथ हे 42 राष्ट्रीय रायफल- 9 गोरखा बटालियनचे कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शहीद कर्नल यांच्या मुलीचा फोटोही व्हायरल झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अलकानेही आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना सॅल्यूट केलं होते.

Published On - 7:53 am, Sat, 2 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI