चोरीच्या घटनेतील सराईत आरोपीला अटक, नवी मुंबई पोलिसांना मोठं यश

कोव्हिड - 19 च्या आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळातील लॉकडाऊननंतर नवी मुंबई आयुक्तालयामधून अनेक सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.

चोरीच्या घटनेतील सराईत आरोपीला अटक, नवी मुंबई पोलिसांना मोठं यश
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 5:40 PM

नवी मुंबई : चोरीच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Chain Snatcher Arrested) यश आलं आहे. या आरोपीकडून एक रिव्हॉलव्हर आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत (Chain Snatcher Arrested).

कोव्हिड – 19 च्या आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळातील लॉकडाऊननंतर नवी मुंबई आयुक्तालयामधून अनेक सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रीत करुन त्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिली.

त्यापार्श्वभूमिवर विशेष पथकं तयार करण्यात आली होती. गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी गेल्या आठवड्यात सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून 20 लाखाच्या दागिन्यासह अटक केली. यावेळी नवी मुंबई आयुक्तालयातील सोनसाखळीचे 20 गुन्हे उघडकीस आणले आहेत (Chain Snatcher Arrested).

या टोळीतील काही जणांच्या मागावर नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा होती. गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, नवी मुंबई आयुक्तलायातील 20 जबरी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि टोळीचा प्रमुख मोहम्मद शब्बीर शकिल शेख हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मानखुर्दला न राहता बेलापूर, उलवा परिसरात रिक्षा चालवत होता. या माहितीच्या आधारे

या माहितीच्या आधारे बेलापूर आणि उलवे परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान मोहम्मद शब्बीर शकिल शेख ला बेलापूर गावातून अटक करण्यात आले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या आत डाव्या बाजुला कमरेजवळ एक विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतूस बेकायदेशीर रित्या बाळगलेले मिळून आले.

Chain Snatcher Arrested

संबंधित बातम्या :

दारुची 14 दुकानं सील तरीही नाशिकच्या लिकर किंगला अटक नाही; एक्साईज विभागाच्या भूमिकेवरुन उलटसुलट चर्चा

नागपुरात बेरोजगारांची दुप्पट रकमेचं आमिष दाखवून फसवणूक, 70 कोटींचा घोटाळा?; आठ जणांना अटक

सोलापूरमध्ये मिथेन गॅसची टाकी पडली, विषारी वायूची गळती; दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

Non Stop LIVE Update
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.