AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पदभरतीत फसवणूक, अध्यक्षांसह बँक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

गेल्या साडेपाच वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असलेल्या मनोहर पाऊणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला (Chandrapur District Bank Recruitment fraud) आहे.

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पदभरतीत फसवणूक, अध्यक्षांसह बँक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल
| Updated on: Jun 27, 2020 | 12:19 AM
Share

चंद्रपूर : गेल्या साडेपाच वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असलेल्या मनोहर पाऊणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरतीत फसवणुकीप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणी अध्यक्ष मनोहर पाऊणकर आणि बँक सरव्यवस्थापक एस. एन. दुबे यांच्या विरोधात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र याप्रकरणी काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी पाऊणकर यांची पाठराखण केली आहे. (Chandrapur District Bank Recruitment fraud FIR lodge against Chairman and Bank manager)

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि बँकेच्या सरव्यवस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार कायद्यातील तरतुदी आणि पुरावे यांचा अभ्यास सुरु केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेत ऑक्टोबर 2019 च्या नंतर अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ही भरती करताना उमेदवाराकडून प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र मागवण्यात आलं होतं. पण हे प्रमाणपत्र अनेकांनी सदोष सादर केलं. त्यात तांत्रिक त्रुटी होत्या. असं असतानाही 24 उमेदवारांची भरती करण्यात आली. यात बँकेची फसवणूक करण्यात आली, असं तक्रारीत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे भरती प्रक्रिया राबवताना अध्यक्षांनी संचालक मंडळाला विश्वासात घेतलं नाही. ही भरती पूर्णपणे नियमबाह्य असून, यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली, असा आरोप करीत शिवसेना नेते संदीप गड्डमवार यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी चंद्रपुरातील रामनगर पोलिसांत तक्रार केली.

महत्त्वाचं म्हणजे बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर आणि संदीप गड्डमवार हे दोन्ही नेते शिवसेनेत आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या या पक्षातील स्थानिक नेत्यात हे राजकीय युद्ध सुरु असल्यानं सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेची ओळख आहे. कोट्यवधींच्या ठेवी इथं आहेत. मात्र या प्रकरणामुळं ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरु

दरम्यान, गड्डमवार यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंवी 420, 471, 37 अन्वये अध्यक्ष पाऊणकर आणि सरव्यवस्थापक एस. एन. दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. मात्र अजूनपर्यंत कुणालाही अटक झालेली नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चंद्रपुरातील मध्यवर्ती कार्यालयातून काही महत्वाचे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याची चौकशी सुरू केली. मागील साडेपाच वर्षांपासून पाऊणकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांना हटवणं विरोधकांना अशक्य असल्यानं ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सहकार क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा बँकेला प्रतिष्ठा आहे. विदर्भातील मोजक्या चांगल्या बँकांत या बँकेचा समावेश आहे. तसेच बँक नफ्यात आहे. मात्र या प्रकरणानं बँकेची प्रतिष्ठा डागाळली गेली आहे. (Chandrapur District Bank Recruitment fraud FIR lodge against Chairman and Bank manager)

संबंधित बातम्या : 

यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक

Yusuf Memon Death | मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक जेलमध्ये मृत्यू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.