Nagpur | चिमुकलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत, मुलगी झाल्याचा आनंद साजरा

चिमुकली घरी येताच तिचं औक्षण करत चौधरी कुटुंबानं मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला.  चौधरी कुटुंबाची ही कृती समाजासाठी नक्कीच आदर्शवत ठरणार आहे.

Nagpur | चिमुकलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत, मुलगी झाल्याचा आनंद साजरा

नागपूर- शहरातील चौधरी कुटुंबानं नवजात मुलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केले. चिमुकली घरी येताच तिचं औक्षण करत चौधरी कुटुंबानं मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला.  चौधरी कुटुंबाची ही कृती समाजासाठी नक्कीच आदर्शवत ठरणार आहे. समाजानं स्त्री जन्माचं स्वागत करावं आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, अशी भावना चौधरी कुटुंबानं व्यक्त केली. (Chaudhari Family of Nagpur welcomes new born baby girl)

नागपूरच्या म्हाळगीनगर भागत राहणाऱ्या चौधरी कुटुंबाने मुलगी झाल्याचा आनंद साजरा केला. मुलगी कुठेही मुलाच्या तुलनेत मागे नाही, उलट ती लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरी येते, त्यामुळं तिचं स्वागत केलं पाहिजे, असं मत आत्या विशाखा मुळेंनी व्यक्त केली.

मुलगी रुग्णालयातून घरी येणार असल्यानं चौधरी यांचे पूर्ण घर सजवण्यात आलं. मुलीच्या स्वागतासाठी फुलांचं रेड कार्पेट टाकण्यात आलं. घरामध्ये केक कापण्यात आला, घरात रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले आणि हे क्षण टीपण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. मुलगी झाल्याचा आनंद आणि मुलींबद्दल समाजात बरोबरीचं स्थान निर्माण व्हावं, यासाठी अनोख्या पद्धतीनं स्वागत केल्याचं विक्रम चौधरींनी सांगितले. 21 व्या शतकात मुली देखील मुलांच्या बरोबरीनं काम करत आहे. मुलीच्या जन्मामुळं आनंद झाल्याची भावना विद्या चौधरींनी व्यक्त केली.

घरातील महिलांनीही चिमुकली येणार म्हटल्यावर एकप्रकारे उत्सवच साजरा केला. मुलीचं स्वागत करण्यासाठी घरातील महिलांमध्ये उत्साह होता, सजून धजून त्यांनी चिमुकलीचं स्वागत केलं. मुलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करून चौधरी कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श ठेवलाय. मुलींबद्दलचा असाच अभिमान प्रत्येकामध्ये येण्याची गरज आहे. तरच समाजातून मुलगा आणि मुलगी असा भेद दूर होईल.

21 व्या शतकातही मुलींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाही. ‘वंश चालविण्यासाठी मुलगा हवाच’ हा आग्रह अनेक कुटुंबाचा असतो. मुलगी झाल्यावर तिला टाकून देणे, मारून टाकणे असेही चीड आणणारे प्रकार आजही सुरूच असल्याचे चित्र आहे. महिलांवर अत्याचाराचे प्रकारही थांबलेले नाहीत, अशा परिस्थितीत चौधरी कुटुंबानं समाजासमोर आदर्श ठेवलाय.

संबंधित बातम्या :

स्त्री भ्रूण हत्या वाढलेल्या जिल्ह्यात 836 मुलींचे बारसे, वंडर बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Chaudhari Family of Nagpur welcomes new born baby girl)

Published On - 5:06 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI