नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, अशी मागणी नागपूर महानगर पालिकेतील स्थायी समितीचे सभापती यांनी केली आहे. (Nagpur Special grant Of 500 Crore demand)

नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर : नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, अशी मागणी नागपूर महानगर पालिकेतील स्थायी समितीचे सभापती यांनी केली आहे. नागपूर मनपा स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र लिहिलं आहे. नागपूर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.  (Nagpur Special grant Of 500 Crore demand from Chairman of the Standing Committee)

कोरोनामुळे यंदा नागपूर महानगरपालिकेचं उत्पन्न घटलं आहे. परिणामी सध्या मनपाच्या तिजोरीत खळखळाट आहे. याचा परिणाम विकास कामांवर होतं आहे. त्यामुळे उपराजधानीचं शहर म्हणून नागपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 कोटी रुपये, विशेष अनुदान द्यावं, अशी मागणी नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिलं आहे.

कोरोनामुळे नागपूर मनपाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलं आहे. कधीकाळी मालमत्ता करातून मनपाच्या तिजोरीत 400 कोटींची भर पडायची. जलप्रदायातूनही शंभर कोटींवर महसूल जायचा. यंदा हे सर्व उत्पन्न घटलं आहे.

त्यामुळेच आयुक्तांनी सादर केलेले बजेट आणि वास्तविक बजेट पाहता किमान 800 ते एक हजार कोटींची तूट यंदा राहणार असं चित्र आहे. राज्य सरकारने किमान 500 कोटी रुपये विशेष अनुदान देण्याची मागणी मनपा स्थायी समितींनी केली आहे.  (Nagpur Special grant Of 500 Crore demand from Chairman of the Standing Committee)

संबंधित बातम्या : 

“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये भरारी पथक तैनात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *