स्त्री भ्रूण हत्या वाढलेल्या जिल्ह्यात 836 मुलींचे बारसे, वंडर बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

स्त्री भ्रूण हत्या वाढलेल्या जिल्ह्यात 836 मुलींचे बारसे, वंडर बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

एक, दोन नव्हे तर 836 मुलींचे बारसे करण्यात आले. या सोहळ्याची दखल वंडर बुक ऑफ रेकॉर्डने घेतली (Girl Name ceremony program in beed) आहे. 

Namrata Patil

|

Jan 05, 2020 | 4:48 PM

बीड : तुम्ही आजवर हजारोंच्या संख्येने होणारे सामूहिक विवाह, सामूहिक व्रतबंध कार्यक्रम पाहिले (Girl Name ceremony program in beed) असतील. मात्र एकाच मंडपात नुकत्याच जन्मलेल्या कन्या रत्नांचा सामूहिक नामकरण सोहळा कधी पाहिला आहे का? स्त्री भ्रूण हत्या वाढलेल्या बीडमध्ये हा अनोखा नामकरण सोहळा रंगला. यावेळी एक, दोन नव्हे तर 836 मुलींचे बारसे करण्यात आले. या सोहळ्याची दखल वंडर बुक ऑफ रेकॉर्डने घेतली (Girl Name ceremony program in beed) आहे.

बीडमध्ये स्व. झुंबरलाल खतोड प्रतिष्ठानमध्ये गेल्या 13 वर्षांपासून नववर्षाच्या स्वागतानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच कार्यक्रमात तीन वर्षांपासून मुलींचा सामूहिक नामकरण सोहळा आयोजित केला जातो. हा कार्यक्रम सुरु झाल्याच्या पहिल्याच वर्षी 151 मुलींचे नामकरण करण्यात आले. दुसऱ्या वर्षी 300, तिसऱ्या वर्षी 501, तर यंदाच्या वर्षी तब्बल 836 मुलींचे नामकरण करण्यात आले.

या नामकरण सोहळ्यासाठी आलेल्या बाळाला पाळणा, खेळणी, घुगऱ्या, ड्रेस आणि ड्रायफ्रूट देण्यात आले. तर बाळाच्या आईला तिरंगा साडी चोळी आणि फेट्याचा आहेर देण्यात आला. वर्षभरात जन्म झालेल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा हा संकल्प असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खतोड यांनी (Girl Name ceremony program in beed) सांगितले.

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमालीचे वाढले होते. एक हजार मुलांमागे 821 मुली असे हे प्रमाण होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी खटोड प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अस मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

या अभूतपूर्व सोहळ्याला मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे मुलींच्या आत्याचं म्हणजेच बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रीतम मुंडे चिमुकल्यांची आत्या बनून आल्या होत्या. मात्र यंदा आत्याबाईनी मला आत्या म्हणू नका, मला मावशी व्हायला आवडेल. अशी साद खासदार प्रीतम मुंडे यांनी यावेळी घातली.

गर्भातच कळ्या खुडणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख झाली होती. आज मात्र या अनोख्या सोहळ्याने बीड जिल्ह्यावर लागलेला डाग पुसून निघाला आहे. एरवी हजारामागे सातशे मुलींचा जन्मदर असलेल्या बीड जिल्ह्यात आता मात्र मुलींचा जन्मदराने बरोबरी केली आहे. आता हाच आदर्श इतर जिल्ह्यात समोर ठेवला आहे. या सोहळ्याची दखल वंडर बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून पुढील वर्षी 1001 मुलींचे नामकरण सोहळा करण्याचा मानस या प्रतिष्ठानने ठेवला (Girl Name ceremony program in beed) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें