AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी ना कधी दुकानं सुरु होणारच आहेत, भुजबळांच्या प्रतिक्रियेने नाशिकच्या पठ्ठ्याला दिलासा

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbals reaction Nashik wine shops) यांनी नाशिकमधील दारु दुकानं सुरु करण्याबाबतचे संकेत दिले आहेत.

कधी ना कधी दुकानं सुरु होणारच आहेत, भुजबळांच्या प्रतिक्रियेने नाशिकच्या पठ्ठ्याला दिलासा
| Updated on: May 05, 2020 | 11:40 AM
Share

नाशिक : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbals reaction Nashik wine shops) यांनी नाशिकमधील दारु दुकानं  सुरु करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशकात दारुच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींची गर्दी वाढल्याने शहरातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे आदेश काल दिला होता. मात्र दुकानचालकांकडून हमी घेऊन, सर्व नियमांच्या अटीवर दुकानं उघडण्याची परवानगी देऊ, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. भुजबळांच्या या प्रतिक्रियेने एका दिवसात 7-8 क्वार्टर रिचवण्याचं टार्गेट ठेवलेल्या पठ्ठ्याला दिलासा मिळाला आहे. (Chhagan Bhujbals reaction Nashik wine shops)

छगन भुजबळ म्हणाले, “नाशिकमध्ये प्रत्येक दुकानदाराकडून हमीपत्र घेऊ, सर्व नियम पाळण्याची हमी घेऊ, त्यानंतर दुकानं उघडण्यासाठी परवानगी देऊ. लोकांनाही सांगणं आहे, बेशिस्त राहिलात तर दुकानं सुरु होणार नाहीत. नियम पाळायला हवेत, कधी ना कधी दुकानं सुरु होणारच आहेत, कोणी आज करेल कोणी उद्या”

हेही वाचा  मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार

वाईन शॉप दुकानांचा गोंधळ राज्यभर झाला. प्रचंड गर्दी झाल्याने नाशिकमध्ये बंद करावं लागलं. कलेक्टरांशी चर्चा झाली. आता प्रत्येक दुकानदारांकडून हमीपत्र घेणार आहोत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळतील, मास्क वापरतील आणि शांतता राखली जाईल, अशी हमी दुकानदारांकडून घेण्यात येईल. त्यानंतर परवागनी देण्यात येईल. सरकारनेच दुकानं सुरु करण्यासाठी सांगितलं आहे, त्यामुळे ही दुकानं आज ना उद्या सुरु होणारच आहेत. फक्त नियम पाळावे लागणार आहेत. अनेक जिल्ह्यात सुरु झाले आणि बंदही झाले. मात्र ही दुकानं कधी ना कधी सुरु होणारच आहेत. या अटी शर्ती यापुढे लागू राहतील, असं छगन भुजबळ म्हणाले.

शहरातील एकूण 51 दारु दुकान मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दारु दुकानं सुरु करण्याबाबत संभ्रम होता, त्यांच्याकडे ऑर्डर नव्हती, ती सकाळी आली आणि दुपारनंतर दुकानं सुरु झाली, त्यामुळे गोंधळ झाला.

याबाबत भुजबळ म्हणाले, सर्व अधिकार कलेक्टर्सकडे असतात. त्यांनी परवाच्या रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंग चालल्या, त्यानंतर ऑर्डर काढून ते देईपर्यंत उशिर झाला. मात्र लोकांनी सकाळी ७ पासून लाईन लावली होती, त्यानंतर दुपारपर्यंत गर्दी वाढली. आता यापुढे तरी तसं काही होऊ नये, याची काळजी घेऊ, असंही भुजबळांनी सांगितलं.

51 दारु दुकान मालकांवर गुन्हे नाशिक शहरातील एकूण 51 दारु दुकान मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 188 आणि साथरोग अधिनियम कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. नियमांचे पालन न केल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आला.

संबंधित बातम्या 

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश 

(Chhagan Bhujbals reaction Nashik wine shops)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.