MPSC परीक्षा पुढे ढकलल्यास वय निघून जाईल, भरतीआड कोणी येऊ नये : छगन भुजबळ

MPSC परीक्षा पुढे ढकलल्यास वय निघून जाईल, भरतीआड कोणी येऊ नये : छगन भुजबळ

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली तर विद्यार्थ्यांचं वय निघून जाईल. त्यामुळे विद्यार्थांचं जर नुकसान आपल्याला टाळायचं असेल ते परिक्षेआड कुणी येऊ नये, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

Akshay Adhav

|

Oct 09, 2020 | 4:28 PM

नाशिक : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली तर विद्यार्थ्यांचं वय निघून जाईल. त्यामुळे विद्यार्थांचं जर नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर परिक्षेआड कुणी येऊ नये, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. (Chhagan Bhujbal On MPSC Exam) ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

एमपीएससी परीक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी आमची बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या आपण परीक्षा पुढे ढकलू तेवढं विद्यार्थ्यांचं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का अडवतोय?, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

भरतीआड कुणी यावं असं मला वाटत नाही. भरतीला जे कुणी विरोध करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आम्हाला नाही तर कुणाला नाही ही भावना चुकीची आहे. यामुळे ओबीसी आणि इतर समाजातील मुलांवर अन्याय होईल. नेत्यांनी बोलताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा, असं भुजबळ म्हणाले.

वंचितचे नेते प्रकाश आंबेकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर बोचरी टीका केली होती. आंबेडकरांनी उदयनराजेंना ‘बिनडोक राजा’ म्हटलं. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मनाला लागतील अशा गोष्टी टाळता आल्या तर टाळाव्या. शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीलत्या लोकांना घेऊन लढाया केल्या आणि त्या जिंकल्या. त्यामुळे महाराज हे सगळ्यांचे आहेत”.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर भुजबळ म्हणाले, “एकनाथ खडसे जर राष्ट्रवादीत आले तर त्यांचं आम्ही स्वागतच करू”. तसंच भुजबळांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडसेंवर केलेल्या वक्तव्यावरून टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना सांगितलंय थोबाडात मारा, आता बघू खडसे काय करतात, असं खडसे म्हणाले.

शिखर बँकेवर बोलताना भुजबळ म्हणाले, “याबाबत मला काही काही माहिती नाही. तपास सुरु आहे. मी यावर अधिक काही बोलणार नाही. तसंच टीआरपीच्या घोळावर देखील भुजबळांनी त्यांचं मत व्यक्त केलं. ही जाहिरातदार, आणि लोकांची फसवणूक आहे. यामध्ये आणखी काही लोक सापडले असतील त्याप्रमाणे कारवाई होईल”, असं भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal On MPSC Exam)

संबंधित बातम्या

MPSC परीक्षा रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; संभाजीराजेंचा इशारा

MPSC परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल, उदयनराजेंचा इशारा

निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, योगीजी विसरू नका : छगन भुजबळ

नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला

Salon Reopen | ….तरच राज्यात सलून सुरु करण्याची परवानगी : छगन भुजबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें