तैवानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या अमेरिकी कंपनीवर चीनची बंदी

| Updated on: Oct 26, 2020 | 9:20 PM

चीनने आपल्या शेजारी राष्ट्र तैवानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या अमेरिकेच्या कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

तैवानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या अमेरिकी कंपनीवर चीनची बंदी
Follow us on

बीजिंग : चीनने आपल्या शेजारी राष्ट्र तैवानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या अमेरिकेच्या कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बोइंग आणि लॉकहीड मार्टिन अशी या कंपन्यांची नावं आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज (26 ऑक्टोबर) ही माहिती दिली. यामुळे रेथियॉन कंपनीच्या करारावरही परिणाम होईल, असं चीन प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले (China to impose ban on American us firms over Taiwan arms sales).

संबंधित अमेरिकी कंपन्यांवर चीनकडून नेमक्या कोणत्या प्रकारचे निर्बंध लादण्यात येणार आहे याविषयीची माहिती चीनकडून देण्यात आलेली नाही. चीन आणि तैवान 1949 मध्ये गृहयुद्धामुळे वेगळे झाले होते. सध्या त्यांच्यात कोणताही राजनैतिक संबंध नाही.

चीनने दावा केलाय की लोकशाही नेतृत्व असलेलं तैवान बेट चीनचा भू-भाग आहे. झाओ यांनी सांगितलं, “चीनचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी आणि सुरक्षेसंबंधित खबरदारी म्हणून चीनने अमेरिकेच्या संबंधित कंपन्यांवर बंदी घातली आहे. या कंपन्यांनी तैवानला शस्त्रास्त्र पुरवली होती.”

दरम्यान, चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानने चीनचं लढाऊ विमान पाडल्याचीही चर्चा सुरु होती (Taiwan attack China fighter plane). याबाबतच एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, तैवानने आपल्या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या चीनच्या सुखोई-35 या लढाऊ विमानाला पाडलं.

याबाबत एक व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तैवानने या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टमचा उपयोग केल्याचं बोललं गेलं. तैवानने चिनी विमानाला अनेकदा इशारा दिला. मात्र त्यानंतरही चीनचं युद्ध विमान तैवानच्या हद्दीत आल्याने तैवानने कारवाई केली, असा दावा करण्यात आला होता.

हेही वाचा :

चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण ‘गेम प्‍लॅन’

लबाड चीन जगासाठी धोकादायक, तैवानचा हल्लाबोल, भारताला अप्रत्यक्ष समर्थन

तैवानने चीनचं विमान पाडल्याची चर्चा, घुसखोरीला रोखठोक उत्तर, अधिकृत घोषणेकडे लक्ष

China to impose ban on American us firms over Taiwan arms sales