कल्याणमधील पत्री पुलाच्या कामाने नागरिक हैराण, लोकगीत लिहिणाऱ्या तरुणाचा मनसेकडून सत्कार

मनसेने पत्री पुलाच्या संथ कामावर लोकगीत लिहिणाऱ्या कलाकारांचा पत्रिपुलावर सत्कार केला आहे (Citizens from Kalyan are suffering due to work of Patri Bridge).

कल्याणमधील पत्री पुलाच्या कामाने नागरिक हैराण, लोकगीत लिहिणाऱ्या तरुणाचा मनसेकडून सत्कार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 11, 2020 | 11:48 PM

ठाणे : कल्याणमध्ये पत्री पूल नव्याने बांधण्याचे काम सुरु आहे. 2 दोन वर्षांपासून या पुलाचं काम सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे. या ट्रॅफिकमुळे नागरीक हैराण झाले असून या समस्येवर स्थानिक भूमिपूत्राने एका लोकगीताच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. याची दखल घेऊन मनसेने हे गाणे तयार करणाऱ्या कलाकारांचा पत्रिपुलावर सत्कार करण्यात आला (Citizens from Kalyan are suffering due to work of Patri Bridge). इतकेच नाही तर मनसेकडून पूलाचे काम करणाऱ्या इंजिनिअरलाही जाब विचारला आहे.

कल्याण डोंबिवली लॉकडाऊन होण्यापूर्वी पत्री पूलाच्या कामामुळे ट्रॅफिक कोंडीमुळे नागरीक त्रस्त होते. 18 नोव्हेंबर 2018 रोजी जुना पत्रीपूल पाडण्यात आला. काही दिवसांनंतर नवीन पुलाचे काम सुरु झाले, मात्र दुसरा पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरु झाले. या पुलावरुन वाहतूक कोंडी होत असल्याने जवळपास एक किलोमीटर वाहनाचा रांगा लागत होत्या. आत्ता अनलॉकमध्ये पत्रीपूलाचे काम सुरु झाले आहे. तसेच रस्त्यावरील ट्रॅफिक वाढली आहे.

सध्या कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा वालधूनी जवळचा एफ केबीन रोडचेही काम सुरु आहे. त्यामुळे हा रस्ता बंद आहे. त्यामुळे वाहतुकीचा सगळा ताण  पत्रीपूलावर आला आहे. एक ते दीड तास पूल पार करण्यासाठी लागतो. रुग्णवाहिका अडकून पडतात. अग्नीशमन दलाच्या गाड्या कोंडीत अडकून पडतात. रस्त्यावरील धूळीचा त्रास प्रवासी आणि चालकांना होतो. कल्याणच्या एका तरुणाने यावर लोकगीत तयार केले आहे. लोकगीत तयार करणाऱ्या याच किशोर आणि त्याच्या साथीदारांचा मनसे पदाधिकारी महेंद्र कुंदे, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मनसेने सुरु असलेल्या पूलाच्या कामाच्या ठिकाणी इंजिनिअरलाही जाब विचारला आहे. यावेळी इंजिनिअरला काहीही उत्तर देता आलं नाही. या आधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्री पूल लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक आंदोलन करण्यात आले आहे. या पुलाचीची हेडलाईन अनेकदा दिली आहे, आठ महिन्याच्या आत नवीन पूल तयार होणार अशा आश्वासन प्रशासनाने दिले होते. आता 2 वर्षे उलटूनही पुलाचे काम अजूनही झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना अजून किती त्रास सहन करावा लागेल अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या :

चिकन व्यवसायाच्या वादातून वयोवृद्ध महिलेला मारहाण, पोलीस कारवाई करत नाहीत, नातेवाईक पोलीस आयुक्तांच्या भेटीला

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक

106 व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड, डोंबिवलीच्या ‘आनंदी’ आजींचं आदित्य ठाकरेंकडून अभिनंदन

Citizens from Kalyan are suffering due to work of Patri Bridge

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें