Corona Vaccine | “साईड इफेकट्स’चा धोका”, 24 तासात 2 कोरोना लसींच्या चाचण्यांवर बंदी

जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करणाऱ्या लस किंवा औषधांच्या शोधासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

Corona Vaccine | "साईड इफेकट्स'चा धोका", 24 तासात 2 कोरोना लसींच्या चाचण्यांवर बंदी

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करणाऱ्या लस किंवा औषधांच्या शोधासाठी (Corona Virus Vaccine) अथक प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) अनेक तज्ज्ञांनी पुढील अडीच महिन्यात कोरोना लस उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कोरोना लस आणि तिची सुरक्षितता यावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेत मागील 24 तासात दोन कोरोना औषधांच्या चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे संबंधित औषधांचा अंतिम चाचणी अहवाल येण्यासाठी उशीर होणार आहे (Corona Virus Vaccine).

आधी अमेरिकेची कंपनी जॉनसन अँड जॉनसनने कोरोना लसीची चाचणी बंद केली. आता अमेरिकेच्या एली लिली (Eli Lilly) कंपनीने कोरोना विषाणुवरील औषधांच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवली आहे.

‘जॉनसन अँड जॉनसन’च्या संशोधन विभाग प्रमुख मथाई माममेनने मंगळवारी सांगितलं की, “चाचणी थांबवणे हा एक तात्पुरता निर्णय असल्याची माहिती गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे. हा निर्णय औषधांमुळेच घ्यावा लागला असेल असं नाही. अंतिम टप्प्यातील वैद्यकीय चाचणीत असं होणं सामान्य आहे. हजारो लोकांवर ही चाचणी करण्यात आली आहे. यामागे औषधांच्या साईड इफेक्टचा शोध घेणे असा आहे.

कंपनीकडून कोरोनावरील 2 औषधांच्या निर्मितीचा प्रयत्न

स्क्रिप्स रिसर्च इंस्टीट्यूटचे संचालक, डॉक्टर आणि वैज्ञानिक एरिक टोपोल यांनी ट्विट करत सांगितलं, “लिलीच्या कोरोना लसीच्या चाचण्या सुरक्षेच्या कारणांमुळे थांबवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही टप्प्यातील चाचणींमध्ये याचे दुष्परिणाम दिसलेले नाहीत. त्यामुळे लवकरच या चाचणी पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे.”

Corona Virus Vaccine

संबंधित बातम्या :

Covid Vaccine Update: कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीनं ट्रायल थांबवलं

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

Published On - 1:06 am, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI