International Nurses Day | मुख्यमंत्री, नेते-अभिनेते ते क्रिकेटपटू, परिचारिका दिनी दिग्गजांकडून नर्सना सलाम

तमाम परिचारिका माता भगिनींना त्यांच्या त्याग, समर्पण व सेवा व्रतासाठी मानाचा मुजरा,असं ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं (CM Actors Cricketers Political Leaders tweets on International Nurses Day)

International Nurses Day | मुख्यमंत्री, नेते-अभिनेते ते क्रिकेटपटू, परिचारिका दिनी दिग्गजांकडून नर्सना सलाम
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 1:01 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने जगभरातील नर्सेसविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. फक्त ‘कोरोना’सारख्या संकटकाळातच नाही, तर कायमच निरपेक्ष वृत्तीने रुग्णाची सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांचे ऋण व्यक्त केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही नर्सेससमोर नतमस्तक झाला. (CM Actors Cricketers Political Leaders tweets on International Nurses Day)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :

जगभर विषाणूचा कहर सुरु असतानाही तुम्ही अनेक रुपात उभ्या आहात. तुमच्या निरपेक्ष आणि सेवाभावामुळेच अनेकजण त्यांच्या कुटुंबीयांत परतत आहेत. तमाम परिचारिका माता भगिनींना त्यांच्या त्याग, समर्पण व सेवा व्रतासाठी मानाचा मुजरा. शतश: नमन!

उपमुख्यमंत्री अजित पवार :

‘आंतरराष्ट्रीय नर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आमच्या परिचारिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची ही निस्वार्थ सेवा इतिहासात नोंदली जाईल आणि कायम स्मरणात राहील.

खासदार सुप्रिया सुळे :

जगभरातील परिचारिका कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आज मैदानात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. त्यांचे कर्तव्याप्रती समर्पण व सेवाभाव संपूर्ण जग पाहतंय. त्यांच्या कार्याला सलाम व आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गृहमंत्री अमित शाह : 

जगभरात मानवतेची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. नर्स आमच्या वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहेत. कोविड19 चा प्रसार रोखण्यात असणारी त्यांची भूमिका खरोखर उल्लेखनीय आहे. आमच्या परिचारिकांच्या अथक प्रयत्नांसाठी भारत त्यांना सलाम करतो.

(CM Actors Cricketers Political Leaders tweets on International Nurses Day)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी :

संपूर्ण भारतभर आमच्या परिचारिका अनेकांचे जीव वाचवण्यास मदत करण्यासाठी चोवीस तास अथक प्रयत्न करत आहेत. त्या आमच्या नायिकाच आहेत, ज्यांचा कुठेही गौरव होत नाही. कोविड19 विषाणूविरुद्ध आमच्या संरक्षण फळीत त्या फ्रंटलाईन सोल्जर आहेत.

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

जगभरातील सर्व परिचारिकांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे, ज्यांनी आजारी आणि गरजूंची काळजी घेत लक्ष पुरवले आहे.

क्रिकेट कर्णधार विराट कोहली :

अशा आव्हानात्मक वेळी आपल्या निःस्वार्थ सेवा, समर्पण, करुणा आणि दयाळूपणाबद्दल धन्यवाद

(CM Actors Cricketers Political Leaders tweets on International Nurses Day)

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.