मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबईकरांच्या हितासाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. (CM Uddhav Thackeray On Mumbai Metro Carshed shifted to Kanjurmarg)

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : “कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे म्हणणाऱ्यांनी मिठागरात मिठाचा खडा टाकू नका,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडवरुन लगावला. “मुंबईकरांच्या हितासाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई मेट्रोच्या कारशेडवरुन राजकारण सुरु आहे. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. (CM Uddhav Thackeray On Mumbai Metro Carshed shifted to Kanjurmarg)

“काहीजण ती जमीन मिठागराची आहे, असं म्हणत आहेत, पण ती जर मिठागराची जमीन आहे, असे म्हणणाऱ्यांना एक कळत तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकत आहात. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तर देऊ,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“मिठाचा खड्याचा इलाज काय करायचा तो करु. पण आम्ही सुद्धा डोळे बंद करुन काही काम करत नाही. जे काही मुंबईकरांच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणार म्हणजे करणारचं. कोणत्याही परिस्थिती करु,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“मेट्रोसाठी जर्मनीच्या के. एफ. डब्ल्यू या कंपनीकडून 545 दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक दरात घेतलं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यावेळी त्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात खूप सोईचे वाटते. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सोबत आहेत. असे म्हटलं होतं” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दिवाळीनंतर धार्मिक स्थळं उघडणार 

राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. (CM Uddhav Thackeray On Mumbai Metro Carshed shifted to Kanjurmarg)

संबंधित बातम्या  

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल: मुख्यमंत्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI