Professional Courses | व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे 2019-20 या वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.

Professional Courses | व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
अनिश बेंद्रे

|

Jun 26, 2020 | 3:34 PM

मुंबई : अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना सूचना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. (CM Uddhav Thackeray requests PM to cancel National level Professional Courses exams amid Corona)

ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल इज्युकेशन (AICTE), काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर (COA), फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया (PCI), बार काऊंसिल ऑफ इंडिया (BCI), नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स एज्युकेशन (NCTE), नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (National Council For Hotel Management & Catering Technology) यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरुन नियंत्रित होणाऱ्या काही संस्थांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात केला आहे.

सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे 2019-20 या वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा : CMO कडून 24 तारखेला पत्र ट्विट, पत्रावर 18 तारीख, अमित ठाकरेंची 22 ला भेट, श्रेयवादातून तारखांचा खेळ?

“सध्याचे वातावरण हे कोणत्याही परीक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणू प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, परीक्षा घेणाऱ्या ॲथॉरिटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे आहे.” याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही मी आपल्याला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करुन राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाशी संबंधित सर्वोच्च संस्थांनी एकसमान मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात, असे निर्देश देण्याची विनंती केली होती, याची आठवण उद्धव ठाकरेंनी मोदींना करुन दिली.

व्यावसायिक तसेच अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्यूल्यानुसार त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यावरही जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी जेव्हा परीक्षा घेता येतील तेव्हा त्या घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या :

अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा नाहीत, ATKT चा निर्णय बाकी : उदय सामंत

परीक्षा घ्या, सीईटी नको, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला न लावण्याची पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांची मागणी

(CM Uddhav Thackeray requests PM to cancel National level Professional Courses exams amid Corona)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें