कोरोना संकटकाळात सरकारचा पेचही सुटला, उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

शिवसेनेच्या नेतृत्वात कॉंग्रेस राष्ट्रवादीसह स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला. (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA)

कोरोना संकटकाळात सरकारचा पेचही सुटला, उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर
| Updated on: Apr 09, 2020 | 1:55 PM

मुंबई : ‘कोरोना’ संकटामुळे विधानपरिषद निवडणूक लांबणीवर गेली असली, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या नेतृत्वात कॉंग्रेस राष्ट्रवादीसह स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला. घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय झाला.

मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं संविधानानुसार बंधनकारक असतं. अन्यथा, मंत्र्याचं पद धोक्यात येण्याची शक्यत असते. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याला पाच महिने होत आले असून कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. लवकरच ते विधानपरिषदेचं सदस्यत्व स्वीकारतील.


(CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA)