Corona – जगभराची खबरबात | जगभरात 80 हजार नवे रुग्ण, अमेरिकेत 14 हजारांवर बळी

अमेरिकेत काल कोरोनामुळे 1 हजार 895 जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांचा आकडा 14 हजार 788 वर गेला आहे (Corona Cases Latest Update in World)

Corona - जगभराची खबरबात | जगभरात 80 हजार नवे रुग्ण, अमेरिकेत 14 हजारांवर बळी

मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने अख्ख्या जगाला जेरीस आणलं आहे. जगभरात कालच्या दिवसात (8 एप्रिल) 6 हजार 367 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये काल सर्वाधिक बळी गेले. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Cases Latest Update in World)

जगात काय स्थिती?

-जगभर काल (8 एप्रिल) कोरोनाचे 6 हजार 367 बळी -जगातल्या एकूण ‘कोरोना’बळींचा आकडा 88 हजार 403 वर -कालच्या दिवसात जगभरात कोरोनाचे 80 हजार नवे रुग्ण -जगात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाख 11 हजारांवर

अमेरिकेत कोरोनाचे थैमान

-अमेरिकेत काल कोरोनामुळे 1 हजार 895 जणांचा मृत्यू -अमेरिकेत एकूण मृतांचा आकडा 14 हजार 788 वर -अमेरिकेत काल 28 हजार नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद -अमेरिकेत आता कोरोनाचे एकूण 4 लाख 28 हजार रुग्ण -पहिल्या दोन लाख रुग्णांची नोंद 10 आठवड्यात -दोन ते चार लाख रुग्णांची नोंद अवघ्या एका आठवड्यातच

युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती

-अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये काल सर्वाधिक बळी – 938 कोरोनाग्रस्त रुग्णांनी बुधवारी प्राण गमावले – ब्रिटीनमध्ये मृतांचा आकडा 7 हजारांच्या पुढे – काल ब्रिटनमध्ये 5 हजार 491 नव्या रुग्णांची नोंद – एकूण रुग्णांचा आकडाही 60 हजारांच्या पुढे

(Corona Cases Latest Update in World)

– स्पेन, इटली, फ्रान्समध्ये कोरोना आवाक्याबाहेर – स्पेनमध्ये काल 6 हजार 278, तर जर्मनीत 5 हजार 633 नवे रुग्ण – स्पेनमध्ये काल 747, तर इटलीत 542 कोरोनाग्रस्त दगावले – फ्रान्समध्ये कालच्या दिवसात 541, तर जर्मनीत 333 ‘कोरोना’मृत्यू – स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीत प्रत्येकी एक लाखापेक्षा जास्त कोरोनाग्रस्त

भारतात रुग्ण वाढतेच

-देशभरात काल कोरोनाचे 28 बळी -भारतातील कोरोनाबळींची संख्या 200 वर -काल एका दिवसात कोरोनाचे 592 नवे रुग्ण -सलग सातव्या दिवशी 500 हून अधिक नवे रुग्ण -देशभर कोरोनाचे 5 हजार 917 रुग्ण

महाराष्ट्रात फैलाव वाढला

-महाराष्ट्रात काल कोरोनाचे 18 बळी -राज्यात एकूण बळींचा आकडा 72 वर -राज्यात काल 8 जणांचा बळी -राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1135 वर -महाराष्ट्रात काल 117 नवे रुग्ण

-मुंबईमध्ये काल 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू -मुंबईतल्या मृतांचा आकडा 45 वर -मुंबईत काल 72 नव्या रुग्णांची नोंद -मुंबईतल्या ‘कोरोना’रुग्णांचा आकडा 714 वर

(Corona Cases Latest Update in World)

Published On - 8:00 am, Thu, 9 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI