तरुणींना अपरात्री फोन करुन अश्लील गप्पा, पुण्यातील कॉम्प्युटर इंजिनिअरला अटक

रात्री दहा वाजल्यानंतर 34 वर्षीय आरोपी राजीव भाटिया रुग्णालय-हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांना फोन करायला सुरुवात करायचा.

तरुणींना अपरात्री फोन करुन अश्लील गप्पा, पुण्यातील कॉम्प्युटर इंजिनिअरला अटक

मुंबई : नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांना फोन करुन त्यांच्याशी अश्लील गप्पा मारणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी कॉम्प्युटर इंजिनिअरला पुण्यातून बेड्या (Computer Engineer Vulgar Talk) ठोकल्या आहेत.

34 वर्षीय आरोपी राजीव सुभाष भाटिया हा पुण्याजवळच्या चिंचवडचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी राजस्थानला गेले. दरम्यानच्या काळात त्याने फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि रुग्णालयांचे नंबर शोधायला सुरुवात केली.

रात्री दहा वाजल्यानंतर हा विकृत महिलांना फोन करायला सुरुवात करायचा. एखाद्या महिला कर्मचाऱ्याने फोन उचलल्यास भाटिया तिच्या सौंदर्याची तारीफ करायचा. हळूहळू महिलांच्या कपड्यांविषयी बोलायचा. त्यानंतर महिलांशी अश्लील भाषेत गप्पा मारायला सुरुवात करायचा, असा आरोप आहे.

कांदिवली पूर्व भागातील एका रुग्णालयात काम करणारी महिला डॉक्टर आणि रिसेप्शनिस्टशी आरोपीने फोनवरुन अश्लील गप्पा मारल्या होत्या. दोघींनी पाच फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीविरोधात समतानगर पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबरवरुन त्याचं लोकेशन शोधून काढलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुंबईतील नरीमन पॉइंट भागात असलेल्या एका नामांकित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरीही करत होता. त्याने आणखी किती मुलींना त्रास दिला आहे, याचा शोध पोलिस (Computer Engineer Vulgar Talk) घेत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI