नागपुरात Belt मध्ये अडकला कंत्राटी कामगार, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने मृत्यू

नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात कामगाराचा मृत्यू झाला. कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. विद्युत केंद्रातील टीपी 103 क्रशर हाऊस परिसरात ही घटना घडली. अमोल हेमराज जाने असं या कामगाराचं नाव आहे. मृतक एका खासगी कंपनीच्या वतीने कंत्राटी कामगार म्हणून सेवा देत होता.

नागपुरात Belt मध्ये अडकला कंत्राटी कामगार, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने मृत्यू
खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने मृत्यू कामगाराचा मृत्यू झाला. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:17 AM

नागपूर : खापरखेडा ( Khaparkheda) 500 मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात झालेल्या भीषण अपघात झाला. टीपी 103 क्रशर हाऊस परिसरातील कन्व्हेअर बेल्टमध्ये (Conveyor Belt) अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. कंत्राटी कामगारांनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. नुकसानभरपाईसंदर्भात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत कंत्राटी कामगार व स्थानिक राजकीय नेत्यांची यशस्वी चर्चा झाली. त्यानंतर मृतक कामगाराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सिल्लेवाडा येथील अमोल हेमराज जाने (वय 32) मृतकाचे नाव आहे. अमोल विवाहित आहे. त्याला दोन मुले आहे. तो खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात लोणारे ब्रदर्स (Lonare Brothers) या कंपनीकडे कंत्राटी कामगार होता. सोमवारी, 21 मार्च रोजी रात्री अकरा वाजता ही घटना घडली.

हात धडावेगळा झाला

अमोल टीपी 103 क्रशर हाऊस येथे काम करत होता. त्याला काही कळण्याच्या आत कोळसा वाहून नेणार्‍या कन्व्हेअर बेल्टमध्ये त्याचा हात अडकला. यात त्याचा एक हात धडावेगळा झाला. अमोलच्या सहकारी कंत्राटी कामगारांना कळताच त्यांनी वीज केंद्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दुर्घटनेची माहिती दिली. त्याला नागपुरातील एलेकिसीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे अतिरक्तस्रावामुळे अमोलचा मृत्यू झाला. खापरखेडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चार दिवसांत अहवाल सादर करण्यात येणार आहे.

मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

22 मार्चला वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर कंत्राटी कामगार एकत्र आले. मृतक अमोलच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत कंत्राटदार लोणारे ब्रदर्स यांच्याकडून 2 लाख व महानिर्मितीच्या सीएसआर फंडातून 2 लाख असा एकूण 4 लाख रुपयांचा धनादेश मृतकाच्या कुटुंबाला देण्यात आला. शिवाय महिनाभरात मृतक अमोलच्या पत्नीला वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून नोकरी देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. क्रशर हाऊस परिसरात लिफ्ट असती तर अमोलचे प्राण वाचण्यास मदत झाली असती, असं कामगारांचं म्हणणं आहे.

Wardha Sena Rada | वर्ध्यातील शिवसेनेचा राडा मद्यपानातून, खासदार कृपाल तुमाने यांची सारवासारव

Nagpur | मानकापूर स्टेडियमवर 27 मार्चला एरोमॉडेलिंग शो, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

Bhandara | वैनगंगा नदीचे प्रदूषण कसे रोखणार? उपाययोजनेचा कृती आराखडा लवकरच तयार होणार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.