रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण (Corona Effect Ratnagiri village) तालुक्यातील परशुराम गावाने स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सोमवारपासून गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते मातीचा भराव आणि बांबूचा अडथळा करत बंद केले आहेत. त्याशिवाय गावचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. अनेक ग्रामस्थ खडा पहारा ठेवला असून बाहेरच्यांना संपूर्ण गावात बंदी जाहीर केली आहे.
त्यामुळे गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात (Corona Effect Ratnagiri village) आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणेसह अन्य भागातून येणाऱ्या नातेवाईक गावी येतात. मात्र यापुढे गावात एकही नातेवाईक येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना कुटुंबांना करण्यात आल्या आहेत.
त्याशिवाय लोटेसह इतर अन्य 6 ठिकाणी कामावर जाणाऱ्या गावातील कामगारांना 31 मार्चपर्यंत गावात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच गावात कोणतेही लग्न, साखरपुडा, बैठका यासारखे अन्य कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवारपासून सर्व गाव प्रमुखांनी गाव बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले (Corona Effect Ratnagiri village) आहेत.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 40 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 कल्याण – 5 सांगली – 4 नागपूर – 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 सातारा – 2 ठाणे -2 पनवेल – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1
एकूण 101
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
एकूण – 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
संबंधित बातम्या :
मुंबईत आणखी एक ‘कोरोना’बळी, यूएईहून परतलेल्या वृद्धाचा मृत्यू