Corona Live Update : महाराष्ट्रात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, कोरोना अपडेट, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेटसह दिवसभरातील मोठ्या बातम्या एकाच ठिकाणी (Corona Live Update) एकाच क्लिकवर

Corona Live Update : महाराष्ट्रात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर


[svt-event title=”महाराष्ट्रात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर” date=”02/05/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : महाराष्ट्रात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांचा आकडा 12,296 वर, दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 93 वर” date=”02/05/2020,6:37PM” class=”svt-cd-green” ] पुणे : शहरात पाच वाजेपर्यंत दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, ससून रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू, पुणे शहरात आतापर्यंत 93 रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”सिमेंट मिक्सरमध्ये तब्बल 18 जण, घर गाठण्यासाठी मजुरांचा जीवघेणा प्रवास” date=”02/05/2020,6:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात दिवसभरात 8 नवे कोरोना रुग्ण, आकडा 40 वर” date=”02/05/2020,6:34PM” class=”svt-cd-green” ] अकोला : अकोल्यात दिवसभरात 8 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, आता पोझिटिव्ह अहवालाची संख्या 40 वर, यातील 11 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू, एकाची आत्महत्या, सध्या 25 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, [/svt-event]

[svt-event title=”Lockdown – 3 : ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी” date=”02/05/2020,6:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वडाळ्यात कोरोनावर मात करुन महिला परतली, टाळ्या वाजवून स्थानिकांकडून स्वागत ” date=”02/05/2020,6:25PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : वडाळा कोरबा मिठागारमध्ये राहणारी महिला कोरोना नेगेटिव्ह, स्थानिकांनीवास्यांनी फूलं आणि टाळ्या वाजवून स्वागत, बीएमसी रुग्णालयात महिला कामाला, उपचारानंतर कोरोनावर मात करून पोहोचली घरी [/svt-event]

[svt-event title=”मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त” date=”02/05/2020,6:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गडचिंचले मॉब लिचिंग प्रकरणातील सर्व आरोपींची कोरोना तपासणी करण्याचे आदेश” date=”02/05/2020,6:17PM” class=”svt-cd-green” ] पालघर : गडचिंचले मॉब लिचिंग प्रकरणातील सर्व अटक आरोपींची कोरोना तपासणी करण्याचे आदेश, गडचिंचले मॉब लिचिंग प्रकरणातील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने पोलीस यंत्रणेसह आरोग्य यंत्रणा खडबडून जागी, सातपाटी पोलीस ठाण्यात ठेवलेल्या सुमारे 15 आरोपींना तपासणीसाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात आणले, आरोपी सहित जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाग्रस्त पोलिसाचा चिखली गावात संपर्क, आरोग्य यंत्रणा सज्ज” date=”02/05/2020,6:11PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : सोलापूर येथील कोरोनाग्रस्त पोलिसाचा चिखली गावात संपर्क, कोरोनाग्रस्त पोलीस चिखली या मूळ गावी येऊन गेल्यानंतर अहवाल पोझिटिव्ह, चिखली गावात आरोग्य यंत्रणा सज्ज, संपर्कात आलेल्याचे स्वॅब नमुने घेणं सुरु [/svt-event]

[svt-event title=”मुंबईसह महाराष्ट्रात एकूण 342 पोलिसांना कोरोनाची लागण ” date=”02/05/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ] मुंबईसह महाराष्ट्रात एकूण 342 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 49 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू तर 290 लोकांवर उपचार सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार मनोज बिंड यांनी बनवली कोरोनाची मूर्ती” date=”02/05/2020,1:00PM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार मनोज बिंड यांनी कोरोनाची मूर्ती बनवली आहे. नागपूरच्या महाल परिसरात ही कोरोनाची मूर्ती बनविण्यात आली आहे. घरातच राहा आणि कोरोनाला हरवा, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा, कोरोना युद्धातील योध्यानचा सन्मान करा, असा संदेशही यावेळी दिला जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात आज 6 कोरोनाबाधित नवीन रुग्ण ” date=”02/05/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] अकोल्यात आज 6 कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळले आहेत. आज सकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे 47 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर अन्य 6 जणांचे अहवाल पोझेटिव्ह आले आहेत. हे सर्व एका खाजगी रुग्णालयात काम करत होते त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”चेंबूरचा एम वेस्ट भाग बनला कोरोना हॉटस्पॉट” date=”02/05/2020,12:41PM” class=”svt-cd-green” ] चेंबूरचा एम वेस्ट भाग कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. आतापर्यंत 270 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 450 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर गोवंडीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. गोवंडीत 325 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 700 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=” अंबरनाथ पोलीस ठाण्यात कोरोनाची एण्ट्री” date=”02/05/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्या 5 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”मातोश्री’बाहेरील आणखी 3 पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह” date=”02/05/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री बंगल्या बाहेरील आणखी 3 पोलीस कॉन्स्टेबल यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांनाही सांताक्रूझमध्ये क्वारंटाइन केलं आहे. यापूर्वी मतोश्रीवर सुरक्षेमध्ये लागलेले 130 सेक्युरिटी स्टाफला क्वारंटाईन केले होते. [/svt-event]

[svt-event title=”पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील आरोपीला कोरोनाची लागण ” date=”02/05/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यातील कासा येथील गडचिंचले येथे झालेल्या मॉब लिचिंग प्रकरणातील अटक असलेल्या आणि वाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या आरोपीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आरोपीला लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या आरोपीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. या आरोपीच्या संपर्का 43 जण आले असून यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात काल दिवसभरात पाच कोरोना रुग्ण ” date=”02/05/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात काल (1 मे) दिवसभरात पाच कोरोना रुग्ण आढळले आहेत. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 144 वर पोहोचली आहे. तसेच नागपुरातील दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नागपूर शहरात आतापर्यंत 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी नवे 23 कोरोना रुग्ण” date=”02/05/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आणखी 23 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद शहराचा आकडा 239 वर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये धक्कादायक पद्धतीने करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगली जिल्ह्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण” date=”02/05/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. दुधेभावी गावातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्य स्थितीत जिल्ह्यातील एकूण 6 कोरोना पोझेटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीमध्ये आणखी दोन नवे कोरोना रुग्ण” date=”02/05/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीमध्ये आणखी दोन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही रुग्ण मुंबईहून आल्याची माहिती मिळत आहे. आणखी दोन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुंबई, पुणेहून आलेल्या सर्व लोकांचे स्वॅब तपासणीकरता घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”मालेगावात नवीन 12 रुग्ण कोरोनाबाधीत” date=”02/05/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] मालेगावात नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मालेगावाताील 23 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 7 नवीन रुग्ण तर रिपीट अहवाल आलेले 5 रुग्ण पुन्हा कोरोनाबाधीत आढळले आहेत. 11 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मालेगावातील कोरोना बाधितांची संख्या आता 282 वर गेली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुक्त असलेल्या मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव” date=”02/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मनमाड येथील 48 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना लागण झालेली महिला मालेगाव पोलीस कर्मचाऱ्यांची आई आहे. या पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे याआधी निष्पन्न झाले होते. [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत आणखी 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह” date=”02/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत आणखी 4 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अमरावतीत आतापर्यंत एकूण 47 रुग्ण आढळले आहेत. 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. 4 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक येवला येथे एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला” date=”02/05/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] नाशिक येवला येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. येवला ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेविकेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्यसेविकेला कोरोनाची लागण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येवल्यात कोरोनाबधितांची संख्या 8 वर पोहोचली आहे, अशी माहिती येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये 20 नवीन कोरोनाबाधित रुग्ण ” date=”02/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण गुरुद्वारा लंगर साहिबमधील कर्मचारी आहेत. नांदेडमध्ये आतापर्यंत एकूण 97 जणांची तपासणी झाली आहे. त्यापैकी 20 पॉझिटिव्ह, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लंगरसाहिबद्वारे शहरात अन्नदान सुरू होते. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, आवाहन प्रशासनाने घेतले आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”02/05/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI