दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवशी 14 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह

दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवशी 14 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 7:52 AM

पुणे : राज्यात दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना एका बाजूला कोरोनाचा धोका (Risk Of Corona) अद्यापही कायम आहे. दिवाळीत असंख्य नागरिक घराबाहेर पडले होते. यामुळे दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: 14 टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. (corona risk increased in Pune after Diwali with 14 percent of patients positive on same day)

मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी केली असता यापैकी 384 जण पॉझिटिव्ह आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. 10 टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता 13 टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे.

पुण्यात कोरोनाचा धोका वाढला पुणे शहरात आत्तापर्यंत 7 लाख 73 हजार 789 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 426 जण पॉझिटिव्ह तर 1 लाख 56 हजार 639 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 4 हजार 401 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (corona risk increased in Pune after Diwali with 14 percent of patients positive on same day)

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात बैठक पार पडली.

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची प्रशासनाची तयारी आहे का? रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याचा आढावा मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला. कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सुरु करणार असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर मोफट टेस्टिंग सेंटरवरही जादा कर्मचारी आणि अन्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्या –

‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून भीती व्यक्त

uddhav thackeray ! …तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

(corona risk increased in Pune after Diwali with 14 percent of patients positive on same day)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.