कर्नाटकात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू : पीटीआय

भारतात 'कोरोना'बाधितांची संख्या 60 वर पोहचली आहे. यामध्ये 36 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. Corona Suspect Death in India

कर्नाटकात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू : पीटीआय
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 1:54 PM

Corona Virus Update in India : कर्नाटकात ‘कोरोना’ संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटक सरकारने दिली आहे. संबंधित रुग्णाला ‘कोरोना विषाणू’ची बाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यास भारतात ‘कोरोना’ने घेतलेला हा पहिला बळी ठरेल. (Corona Suspect Death in India)

मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध व्यक्तीचे आरोग्य अहवाल अद्याप आलेले नसल्याचं सांगत कर्नाटकातील आरोग्य आयुक्तांनी हा ‘कोरोना बळी’ असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनेही संबंधित व्यक्ती ‘कोरोना’ संशयित असल्याचा उल्लेख केला आहे.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोरोना’ व्हायरसने (Covid-19) भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात ‘कोरोना’बाधितांची संख्या 60 वर पोहचली आहे. यामध्ये 36 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. तर 16 कोरोनाग्रस्त हे भारत दौऱ्यावर असलेले इटालियन नागरिक आहेत.

दुबईहून आलेल्या पुणेकर दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांनाही संसर्ग झाल्याचं उघड झालं. यामध्ये दाम्पत्याचीच कन्या, नातेवाईक आणि संबंधित कुटुंबाला मुंबईहून पुण्याहून घेऊन येणाऱ्या ओला कॅब चालकाचा समावेश आहे.

कोरोनाबाधित सर्व रुग्णांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून सौम्य स्वरुपाचा कोरोना असल्याची माहिती आहे.

टिप्स : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

पिंपरी चिंचवडमध्ये एका, तर नागपूरमध्ये तिघा जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचा संशय आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांची कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात आली, संध्याकाळपर्यंत त्यांचा अहवाल येणार आहे. त्यांच्यासोबत ‘ग्रुप टूर’ आणि विमानात असलेल्या ठाणे, रायगड, बीडच्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली.

दरम्यान, मंगळवार 10 मार्च रोजी केरळात कोरोनाच्या आणखी आठ रुग्णांची भर पडली. भारतीय वंशाच्या एका नागरिकाला ब्रिटनमध्ये ‘कोरोना’ला बळी पडावे लागले. (Corona Suspect Death in India)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.