Maharashtra Corona Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार, कुठे किती नवे रुग्ण?

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुण्यासह, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत (Corona Virus Maharashtra) आहे.

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार, कुठे किती नवे रुग्ण?

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार पोहोचला (Corona Virus Maharashtra) आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुण्यासह, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा अक्षरशः हाहा:कार माजला आहे. आज दिवसभरात 126 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 043 इतका झाला आहे. ‬

मुंबईत आज (30 एप्रिल) नव्या 8 रुग्णांची नोंद करण्यात आले. हे सर्व रुग्ण मुंबईतील नायर रुग्णालयाचे कर्मचारी आहे. तर दुसरीकडे गोवंडी परिसरातील एका कॉलेज तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 6644 वर पोहोचली आहे.

कल्याण-डोबिंवलीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात सहा नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील चार रुग्ण हे डोंबिवलीतील आहेत. तर उर्वरित 2 रुग्ण हे इतर परिसरातील आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोना रुग्णांचा आकडा 162 वर पोहोचला आहे.

वसई विरार नालासोपाऱ्यात आज नवे 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 132 वर पोहोचली आहे. यातील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 46 जणांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित 76 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वसई विरार क्षेत्रात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाचा वेग मंदावला आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आणखी दोन भाजीपाला व्यापाऱ्यांना कोरोना झाला आहे. हे दोन्ही व्यापारी कोरोनाबाधित व्यापाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाली आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 206 आहे.

महाराष्ट्रात कुठे किती नवे रुग्ण?

  • मुंबई – 8
  • कल्याण डोंबिवली – 6
  • वसई विरार – 2
  • नवी मुंबई – 2
  • मालेगाव – 71
  • अमरावती – 12
  • औरंगाबाद – 21
  • यवतमाळ – 2
  • हिंगोली – 1
  • कोल्हापूर – 1

मालेगावात ‘कोरोना’चा हाहा:कार

मालेगावात ‘कोरोना’मुळे अक्षरशः हाहा:कार माजला आहे. मध्यरात्रीत तब्बल 71 जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकट्या मालेगावात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 253 वर पोहोचली आहे.

अमरावती, औरंगाबादला कोरोनाचा विळखा

अमरावती परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला (Corona Virus Maharashtra) आहे. अमरावती परिसरात आज 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमरावती येथील कोरोनाबाधितांचा आकडा हा 40 वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये गेल्या 24 तास 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (30 एप्रिल) औरंगाबादेत आणखी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 151 वर पोहोचला आहे.

यवतमाळमध्ये आज 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 88 वर पोहोचला आहे. यातील 10 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या यवतमाळमध्ये 78 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर नागपुरात आज दोन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

हिंगोली, कोल्हापुरातही रुग्णांची संख्या वाढली 

हिंगोली परिसरात आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 3 SRPF जवानांचा समावेश आहे. तर कोल्हापुरात आणखी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 वर पोहोचला (Corona Virus Maharashtra) आहे.

संबंधित बातम्या : 

रुग्ण बरे होत आहेत, नागपुरात 42, यवतमाळमध्ये 10 तर अमरावतीत 4 रुग्णांची कोरोनावर मात

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 35 जणांना कोरोनाची लागण

मालेगावात ‘कोरोना’चा हाहा:कार, मध्यरात्रीत तब्बल 71 नवे रुग्ण, आकडा अडीचशेपार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI