विवाहबाह्य संबंध असलेलं जोडपं लटकलेल्या अवस्थेत आढळलं

या दोघात नक्की काय संभाषण झालं आणि त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत मोबाईल कॉल डिटेल्समधून अधिक उत्तरे मिळणार असल्याने पोलिसांनी आपला तपासाचा रोख त्याकडे केंद्रित केला आहे.

विवाहबाह्य संबंध असलेलं जोडपं लटकलेल्या अवस्थेत आढळलं

चंद्रपूर : विवाहबाह्य संबंध असलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. चंद्रपूर शहरालगत घुग्गुस मार्गावरील पांढरकवडा शेतशिवार एका दुर्दैवी घटनेने हादरुन गेलं. एका प्रेमी युगुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. यातील दोघेही विवाहित असल्याने प्रारणातील गूढ वाढलं आहे. या दोघात नक्की काय संभाषण झालं आणि त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत मोबाईल कॉल डिटेल्समधून अधिक उत्तरे मिळणार असल्याने पोलिसांनी आपला तपासाचा रोख त्याकडे केंद्रित केला आहे.

पांढरकवडा गावाच्या शेत शिवारात ही घटना उजेडात आली. एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत हे मृतदेह आढळले. या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. संबंधित विवाहित तरुण नागपूरचा आहे, तर विवाहित तरुणी चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे.

घटनेची माहिती मिळताच घुग्गुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. विशेष म्हणजे यातील दोघेही विवाहित आहेत. दोघांना आपली स्वतंत्र कुटुंबे आहेत. या दोघांची नागपुरात ओळख झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तरुण काल रात्री चंद्रपुरात आला. दोघांची चंद्रपुरात भेटही झाली. नंतर रात्री 10.30 वाजता हा तरुण आपल्या दुचाकीने घटनास्थळी पोहोचला आणि त्याने सुनिताला बोलावलं. यानंतर दोघांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. मृत युवकाची दुचाकी घटनास्थळी आढळून आली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI