वय अवघं 24 वर्ष, लॉकडाऊनमध्ये कमावले लाख रुपये, नोकरी सोडलेल्या MBA तरुणीची यशोगाथा

प्रिया राजेंद्र शिळसकर हिचे वय 24 वर्ष असून तिने एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केलं (Pune Girl Homemade Cake business Lockdown) आहे.

वय अवघं 24 वर्ष, लॉकडाऊनमध्ये कमावले लाख रुपये, नोकरी सोडलेल्या MBA तरुणीची यशोगाथा
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 3:34 PM

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही जण नोकऱ्या वाचवण्यासाठी धडपडतात. मात्र अंगावर आलेली जबाबदारी सांभाळून लॉकडाऊनमध्ये पुण्यात राहणाऱ्या प्रिया शिळसकर या तरुणीने घरच्या घरी केक बनवले. त्याच्या विक्रीतून तब्बल एक लाख रुपयांचं आर्थिक उत्पन्नही मिळवलं आहे. प्रिया राजेंद्र शिळसकर हिचे वय 24 वर्ष असून तिने एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. घरी आईची जबाबदारी असल्याने प्रियाने आपली नोकरी सोडली. त्यानंतर केक बनवण्याचा कोर्स पूर्ण केला. घरीच केक बनवायला सुरुवात केली. (Pune Girl Success Started Homemade Cake business During Lockdown)

लॉकडाऊनच्या काळात नेमकं काय करायचं? हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. मात्र या प्रश्नाचं उत्तरं प्रियाने शोधलं. तिने केक बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात केक शॉप बंद असल्यानं अनेकांना वाढदिवसाला केक मिळत नव्हते. हीच गरज ओळखून प्रियानं घरी केक बनवले. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या कळात तब्बल 200 केकची तिने घरबसल्या विक्री केली. यातून तिने जवळपास लाखभर रुपयांच आर्थिक उत्पन्नही मिळवलं.

सध्या तिच्याकडे बरेचसे फ्लेवर्स हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एक किलोपासून दहा किलोपर्यंतचा ती केक बनवते. या कामात तिला तिची लहान बहीण मदत करते. तर वडिलांचाही मोठा हातभार तिला आहे. या कामाला सुरुवात केल्यानंतर तिने त्यातून आधुनिक यंत्र खरेदी केले आहेत.

प्रियाची आई दोन्हीही डोळ्यांनी अंध आहे. प्रियाला हे सगळं सांभाळून तिचा हा केकचा व्यवसाय सांभाळावा लागतो. लेकीची कला बघायला जरी आईला दृष्टी नसली तरीदेखील लेकीच्या कामाचा अभिमान असल्याचं तिची आई सांगते. प्रियाने आज बनवलेला केक हा कोरोना वॉरियर्सना समर्पित केला.

एकीकडे लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटातून अनेक जण आत्महत्या करत आहे. त्यामुळे प्रिया करत असलेले काम अनेकांना प्रेरणादायी ठरु शकते. केकची विक्री करायला शॉपचं असावं असं काही नाही तर फक्त जिद्द हवी. याच जिद्दीच्या जोरावर तिने हे सगळं उभं केलं. तिला भविष्यात केक शॉप उभं करायचं आहे. तसेच आपल्या केकचा ब्रँडदेखील बनवायचा आहे. अनेक महिलांनी प्रियासारखा प्रयोग घरी केला तर बरंच काही होऊ शकतं एवढं मात्र नक्की.. (Pune Girl Success Started Homemade Cake business During Lockdown)

संबंधित बातम्या : 

मत्स्यप्रेमींना हवाहवासा ‘जिताडा’ उरणमध्ये सापडला, 35 किलोच्या माशाची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ना धोतराच्या पायघड्या, ना मेंढ्यांचं रिंगण; ‘कोरोना’ने काटेवाडीकरांच्या उत्साहावर विरजण

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.