कौआ बिर्याणी, चिकनऐवजी कावळ्यांच्या मांसाची विक्री, दोघांना अटक

तुम्ही जर रस्त्यावरील स्टॉलवर चिकन खात असाल तर सावध व्हा. कारण काही शहरांमध्ये चिकनऐवजी कावळा आणि कुत्र्याचे मांस (Crow biryani in tamilnadu) विकले जात आहे.

कौआ बिर्याणी, चिकनऐवजी कावळ्यांच्या मांसाची विक्री, दोघांना अटक

चेन्नई : तुम्ही जर रस्त्यावरील स्टॉलवर चिकन खात असाल तर सावध व्हा. कारण काही शहरांमध्ये चिकनऐवजी कावळा आणि कुत्र्याचे मांस (Crow biryani in tamilnadu) विकले जात आहे. नुकतेच तामिळानाडूच्या रामेश्वरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. येथील रस्त्यावरील स्टॉलवर चिकनऐवजी कावळ्याचे मासं विकले जात होते. खाद्य विभागाने छापा मारल्यानंतर ही घटना उघडकीस (Crow biryani in tamilnadu) आली.

या प्रकरणात तामिळनाडू पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 150 मृत कावळे जप्त केले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली दिसत आहे.

रामेश्वर मंदिरात दररोज एक भक्त येत होता. तो तेथील मंदिर परिसरातील कावळ्यांना दाने खायला घालत होता. पण कालांतराने कावळ्यांचा मृत्यूमध्ये वाढ झाली. त्यामुळे त्याने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याला मंदिरा रोडला रस्त्यावर चिकन विकणाऱ्या स्टॉलवर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्या स्टॉलचीही चौकशी केली.

स्टॉलची चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली की, स्टॉलवरील कर्मचारी कावळ्यांना विषारी तांदूळ देऊन कावळ्यांची शिकार करत होते. त्यानंतर चिकन म्हणून कावळ्यांची विक्री तेथील छोट्या दुकानात करत होते, अशी माहिती पोलिसांनी सांगितली.

यापूर्वीही मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 2018 ला खाद्य विभागने कुत्रे आणि मांजर मारुन त्यांचे मांस विकणाऱ्यांना अटक केले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI