दिल्लीत कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण, सरकारने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Dec 31, 2020 | 8:52 AM

दिल्ली सरकारने 31St आणि 1 जानेवारीला संभाव्य गर्दी लक्षात घेता आज आणि उद्या (31 डिसेंबर आणि 1 जानेवारी) रात्री 11 ते सकाळी 6 दिल्लीत कर्फ्यू लावला आहे.

दिल्लीत कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण, सरकारने घेतला मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली :  ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रुपातील कोरोना विषाणूमुळे (Corona New Strain) जगभरातील देशांची पुन्हा झोप उडाली आहे. नवे रंगरुप घेऊन आलेला कोरोनाचा हा नवा अवतार पूर्वीच्या विषाणूपेक्षा भयंकर आहे. राजधानी दिल्लीतही (New Delhi) कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण मिळाले आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने 31St आणि 1 जानेवारीला संभाव्य गर्दी लक्षात घेता आज आणि उद्या (31 डिसेंबर आणि 1 जानेवारी) रात्री 11 ते सकाळी 6 दिल्लीत कर्फ्यू (Curfew) लावला आहे. (Curfew in New Delhi on 31st December and 1st January From 11 Pm to 6 Am)

दिल्लीतील अनेक लोकप्रिय ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताला भल्या पहाटे लोक गर्दी करु शकतात. तसंच 31St ला ही काही उत्साही मंडळी मध्यरात्री घराच्या बाहेर पडून अनावश्यक गर्दी करु शकतात. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारने आज आणि उद्या रात्री 11 ते सकाळी 6 दिल्लीत कर्फ्यू लावला आहे.

दिल्लीकरांना 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यामधून आपात्कालिन सेवेतील नागरिकांना सूट देण्यात आली आहे.

ब्रिटनमधून परतलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून राजधानी दिल्लीतल्या आठ जणांना रुग्णांना नव्या कोरोना अवताराची लागण झाली आहे. वर्षभरापासून पिच्छा पुरवणाऱ्या कोरोनामुळे देशातील जनता आधीच दहशतीखाली असताना नव्या विषाणूची ही बातमी लोकांच्या काळजात धस्स करणारी आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या अवताराची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने लगोलग निर्णय घेत 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून येणाऱ्या तसंच जाणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातलीय. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरची अंशतः बंदीदेखील अजून एक महिन्याने वाढवली आहे.

दरम्यान, नव्या वर्षातल्या पहिल्या महिन्यावरही कोरोनाचे सावट कायम आहे. ‘वंदे भारत’ अंतर्गत काही ठराविक रुटवर विमानसेवेस परवानगी आहे. ब्रिटन वरुन येणाऱ्या फ्लाईटसाठी बंदीची मुदत आधीच 7 जानेवारी पर्यंत वाढवली आहे. (Curfew in New Delhi on 31st December and 1st January From 11 Pm to 6 Am)

हे ही वाचा

कोरोनाचा नवा अवतार देशातील 36 कोटी लहान मुलांसाठी धोकादायक, वाचा कसा?