AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयफ्रेंड शोधण्यासाठी 8 दिवस सक्तीची सुट्टी, सिंगल मुलींसाठी सरसकट नियम

बीजिंग(चीन): भारताशेजारचा देश चीन कधी काय करेल हे सांगता येत नाही. सुईपासून विमानापर्यंत सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेला चीन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. चीनमध्ये वयाच्या तिशीपर्यंत लग्न न झालेल्या सिंगल अर्थात एकट्या तरुणींना तब्बल 8 दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे या महिलांना जोडीदार शोधण्यासाठी, डेटिंगसाठी या सुट्ट्या देण्यात येत आहे. लव्ह लीव किंवा […]

बॉयफ्रेंड शोधण्यासाठी 8 दिवस सक्तीची सुट्टी, सिंगल मुलींसाठी सरसकट नियम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

बीजिंग(चीन): भारताशेजारचा देश चीन कधी काय करेल हे सांगता येत नाही. सुईपासून विमानापर्यंत सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेला चीन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. चीनमध्ये वयाच्या तिशीपर्यंत लग्न न झालेल्या सिंगल अर्थात एकट्या तरुणींना तब्बल 8 दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे या महिलांना जोडीदार शोधण्यासाठी, डेटिंगसाठी या सुट्ट्या देण्यात येत आहे. लव्ह लीव किंवा डेटिंग लीव असं या सुट्ट्यांना संबोधलं जातं. प्रेमाचा, जोडीदाराचा शोध घ्यावा, असा या लव्ह किंवा डेटिंग लीवचा उद्देश आहे. ‘बीबीसी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

चीनमध्ये सिंगल राहण्याचं प्रमाण वाढत आहे. करियरच्या नादात घर-कुटुंबाच्या बंधनात न अडकणं अनेकजण पसंत करत आहेत. मात्र चीनमध्ये विशीतील अविवाहित मुलींना अपमानजनक शब्द वापरला जातो. हा शब्द आहे ‘शेंग नु’ आणि त्याचा हिंदीतील अर्थ आहे ‘छूट चुकी महिलाएं’.

सिंगल राहिल्यामुळे चीनमध्ये त्याचा जन्मदरावर परिणाम होत आहे. त्यामुळे महिलांना लग्नासाठी नैतिक दबाव आणण्यासाठी या सुट्ट्या दिल्या जात असल्याचं तिथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लेखिका लेटा फिंचर यांच्या मते, “चीन सरकार 20 किंवा 30 वर्षीय मुलींना याप्रकारची सुट्टी देऊन सरकार त्यांना एकप्रकारे लग्नबंधनात बांधण्याचा प्रयत्न करत आहे”

चीनमधील घटता जन्मदर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अशी चीनची ओळख. मात्र चीनने एक अपत्य धोरण लागू केलं होतं. त्यानंतर जन्मदरात घट झाली होती. पण 2015 मध्ये एक अपत्य धोरण रद्द करुनही तिथल्या जन्मदराचं प्रमाण घटतच आहे. शिवाय 2013 नंतर चीनमध्ये लग्न करणाऱ्यांचंही प्रमाण घटलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये चीनमध्ये जवळपास 1.5 कोटी बाळांचा जन्म झाला, हा आकडा 2017 पेक्षा दोन लाखांनी कमी होता.

लेखिका होंग फिचर यांच्या मते, चीनमध्ये लिंग गुणोत्तर व्यस्त प्रमाणात आहे. एक अपत्यामुळे आपल्याला मुलगाच असावा अशी धारणा चीनमध्येही आहे. त्यामुळे मुलींचं प्रमाण घटत आहे. सध्या चीनमध्ये पुरुषांमागे 3 कोटी महिलांची संख्या कमी आहे.

देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...