AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओला दुष्काळ जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या संबंधित भागातील शेतक-यांना तातडीने मदत करा तसंच ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली.

ओला दुष्काळ जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Oct 16, 2020 | 6:50 PM
Share

पाटणा : महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या संबंधित भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीसांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (Devendra fadanvis letter To Cm Uddhav Thackeray over Wet drought)

“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणं गरजेचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केलंय.

“गेल्या 3 ते 4 दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. तो मदतीसाछी आर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून वेदना होतात. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फूटत नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत यापलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामे देखील होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. आज अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे”, अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“पीक काढणीचं काम सुरु असताना तुफान पाऊस झालाय. शेतकऱ्यांचा लागवड खर्चही आता निघणार नाही. वाहिन्यांवर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे. मदतीसाठी तो आर्जव करीत आहे पण त्याला जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे कसे”, असा शेतकऱ्यापुढे प्रश्न असल्याचं फडणवीस म्हणाले.

सातत्याने विनंती करुनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर 25 ते 50 हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरुन तर शेतकऱ्यांना आणखीनच वेदना होतायत. मराठवाड्यातला प्रश्न फारच गंभीर आहे. तेथे तातडीने मदत पोहचणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले.

“आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आतातरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुकसानीची व्यापकता आणि सर्वत्र झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 44 जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीदरम्यान पुणे विभागात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला.

(Devendra fadanvis letter To Cm Uddhav Thackeray over Wet drought)

संबंधित बातम्या

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44 जणांनी जीव गमावला

मुसळधार पावसानं वाहून गेला पूल, पावसाचं रौद्र रुप दाखवणारे भीषण PHOTOS

‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा’, स्वाभिमानी युवती आघाडीचा रास्तारोको

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...