AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साईंचा जन्म आमच्या गावातील, पाथरी, शिर्डी वादात धुपखेडातील ग्रामस्थांची उडी

साई बाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादात औरंगाबादच्या धुपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे.

साईंचा जन्म आमच्या गावातील, पाथरी, शिर्डी वादात धुपखेडातील ग्रामस्थांची उडी
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 20, 2020 | 8:39 PM
Share

औरंगाबाद : साई बाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादात औरंगाबादच्या धुपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे (Sai Baba Birthplace Issue). साईबाबा यांचे प्रगटस्थान धुपखेडा (Dhupkheda) असून बाबा सर्वात आधी इथेच दिसले असून तिथला विकास करण्यासाठी निधी द्या, असा ठराव धुपखेडाच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला (Sai Baba Birthplace Issue).

साई बाबा यांच्या चरित्रात ज्या चांद भाई यांचा उल्लेख आहे. ते चांद भाई औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या धुपखेडा येथे पोलीस पाटील होते. त्यांनाच साईबाबा सर्वात आधी दिसले. बाबांनी त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांद भाई यांनीच बाबांना धुपखेडा येथे आणले आणि इथून बाबा शिर्डीला गेले, असा दावा धुपखेड्याच्या ग्रामस्थांनी केला. धुपखेडा विकासाची मागणी आजची नसून ही मागणी खुपवर्षं जुनी असल्याचा दावा माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केला.

साईबाबा धुपखेड्याच्या डोंगरात फिरत होते. त्यावेळी चांदभाई यांचा घोडा हरवला होता. तो घोडा साईबाबा यांनी शोधून दिला. त्यावेळी साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट झाली. चांदभाई यांनी त्यांना धुपखेड्यात आणलं. त्यावेळी जगाला साईबाबा यांची ओळख झाली.

धुपखेड्यात राहत असताना साईबाबा अनेकवेळा गायब व्हायचे. ते लिंबाच्या झाडावर जाऊन बसायचे. ज्या झाडावर बाबा बसायचे त्या झाडाचा पाला आजही कडू लागत नाही, असाही दावा ग्रामस्थ करतात. जवळपास तीन ते चार वर्षे साईबाबा धुपखेड्यात राहिले. त्याकाळात त्यांनी अनेक चमत्कार केले.

लोकांना त्यांनी चांगल वागायची शिकवण दिली. ज्या झाडावर ते बसायचे त्याच्या खालीच त्यांचं स्थान आजही पूजनीय आहे. तिथून ते शिर्डीला गेले आणि तिथे स्थाईक झाले. मात्र बाबांचे चरण पहिले धुपखेड्याला लाभले. ते राहत असलेल्या ठिकाणी आजही अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे पाथरी आणि शिर्डीसोबतच या स्थळाचा देखील विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

धुपखेडा येथे ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला असून, याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात आली आहे. “आमची मागणी जुनीच, कोणाला देऊ नका असं आमचं म्हणणं नाही, त्यांच्यासोबत साई प्रगट झालेल्या आमच्या या धार्मिक स्थळाला देखील विकास निधी देऊन भाविकांची सोय करा”, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असल्याची माहिती आमदार संजय वाघचौरे यांनी सांगितलं.

Follow Us
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त