आधी आदित्य ठाकरेंसोबत डिनर, आता टायगरसोबत दिशा पटाणीचं ब्रेक अप!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या रिलेशनबाबत चित्रपटसृष्टीत मोठ्या काळापासून चर्चा सुरु आहे. मात्र, आता नव्याने आलेल्या माहितीनुसार या दोघांचं ब्रेकअप झालं आहे.

आधी आदित्य ठाकरेंसोबत डिनर, आता टायगरसोबत दिशा पटाणीचं ब्रेक अप!


मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या रिलेशनबाबत चित्रपटसृष्टीत मोठ्या काळापासून चर्चा सुरु आहे. मात्र, आता नव्याने आलेल्या माहितीनुसार या दोघांचं ब्रेकअप झालं आहे. ‘पिंकव्हिला’ या इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बागी-2 चित्रपटात दिशा पटाणी आणि टायगर श्रॉफची भन्नाट केमेस्ट्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या दोघांना एकमेकांसोबत पाहण्यात आले. त्यामुळे दोघांच्या रिलेशनच्या चर्चेला उधाण आले होते. दिशाला टायगरच्या बहिणीसोबतही पाहिले गेले, त्यामुळे त्यांचे कौटुंबिक नाते असल्याचेही समोर आले. या दोघांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांकडूनही चांगलेच पसंत केले गेले.

काही आठवड्यांपूर्वीच टायगर आणि दिशाला एकमेकांसोबत एका हॉटेलमध्ये पाहिले गेले. त्यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे तेथून जाताना टायगरने दिशाच्या संरक्षणासाठी तिच्याभोवती हातांची कडी करुन मार्ग काढला. टायगरने दिशाच्या जन्मदिनाला तिच्यासोबतचा एक डान्स व्हिडीओ देखील शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Happy birthday D! ????????????????????????????????❤❤❤ @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on


दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशा पटाणी एका हॉटेलमध्ये युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसली. त्यानंतर दिशाचे आदित्य ठाकरेंसोबतही नाव जोडले जाऊ लागले. त्या दोघांच्या नावाचीही मोठी चर्चा झाली. त्यामुळेच दिशा आणि टायगरच्या नात्यात चढउतार आले. अखेर दिशा आणि टायगरने एकमेकांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे दिशा आणि टायगरने सार्वजनिकपणे त्यांच्या नात्याला कधीही दुजोरा दिला नव्हता. त्यांच्या नात्याविषयी बोलणे त्यांनी नेहमीच टाळले. मात्र, असे असतानाही त्यांना नेहमीच एकमेकांसोबत सहजपणे वावरताना पाहिले गेले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI