भारताचे ऋण विसरणार नाही, ट्रम्प नमले, मोदी म्हणतात मानवतेच्या युद्धात अमेरिकेसोबत

हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसाठी भारताने केलेल्या मदतीसाठी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

भारताचे ऋण विसरणार नाही, ट्रम्प नमले, मोदी म्हणतात मानवतेच्या युद्धात अमेरिकेसोबत

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Praises India) यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसाठी (Hydroxychloroquine) भारताने केलेल्या मदतीसाठी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत भारत आणि मोदींचे आभार मानले. यावर मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. वेळ मित्रांना आणखी जवळ आणते, कोरोना विषाणूविरुद्धच्या मानवतेच्या लाढाईत भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं मोदी (Donald Trump Praises India) म्हणाले.

पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली. “अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहेत. असे प्रसंग मित्रांना आणखी जवळ आणतात. भारत आणि अमेरिकेची पार्टनरशीप आणखी मजबूत झाली आहे. कोविड-19 विरुद्धच्या या लढ्यात भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. आपण यावर मिळून विजय प्राप्त करु”

डोनाल्ड ट्रम्पकडून भारताचं कौतुक

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत भारताचं कौतुक केलं. “कठीण परिस्थितीत मित्रांच्या मदतीची गरज असते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या निर्णयाबद्दल आम्ही भारत आणि भारतीय जनतेचे आभार मानतो. ते विसरु शकणार नाही. या लढाईत केवळ भारतच नव्हे, तर मानवतेसाठी मदत करण्यासाठी घेतलेल्या दृढ नेतृत्त्वाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो”, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं (Donald Trump Praises India).

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारताकडे मदत मागितली होती. ट्रम्प यांनी याबाबत एक वक्तव्यही केलं होतं. त्टयामुळे भारताला धमकी देण्यात आली होती. भारताच्या मदतीनंतर ट्रम्प यांचे सूर जरा बदललेले दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं 

डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत देताना म्हटलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान आहेत आणि खूप चांगले आहे. भारताकडून अद्याप बऱ्याच चांगल्या गोष्टी येणे शिल्लक आहे. अमेरिकेने कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे 29 दशलक्ष डोस खरेदी केले आहेत. यापैकी मोठ्या प्रमाणात औषधं ही भारतातून येणार आहेत.” (Donald Trump Praises India)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI