दिल्लीपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

दिल्लीपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

राजधानी दिल्लीत आज (20 डिसेंबर) अनेक ठिकाणी भूकंपाचे झटके (Earthquake in delhi) बसले. संध्याकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी दिल्लीत भूकंप झाला.

Namrata Patil

|

Dec 20, 2019 | 7:47 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तरप्रदेश आणि पाकिस्तान या ठिकाणी आज (20 डिसेंबर) भूकंपाचे झटके (Earthquake in delhi) जाणवले. दिल्लीत संध्याकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिस्टेल असल्याची माहिती मिळत (Earthquake in delhi) आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या भूकंपाचे केंद्र हे अफगाणिस्तान हिन्दूकुश या ठिकाणी आहे. हिन्दूकुश या पर्वतरांगा असून हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या या दोन्ही देशांच्या मध्ये आहे.

दिल्लीत झालेल्या भूकंपादरम्यान काश्मीर आणि चंदीगड याठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच उत्तर भारतातही अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले. जवळपास 25 सेकंदापर्यंत दिल्लीत अनेक ठिकाणी भूकंपाचे झटके बसले.

पाकिस्तानच्या पेशावर या ठिकाणीही भूकंपाचे झटके बसल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या ठिकाणी बऱ्याच शहरात भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामुळे जवळपास 10 सेकंद जमीन हादरली.

देशात दिल्ली-एनसीआरशिवाय श्रीनगर, अमृतसर, चंदीगड, फरीदाबाद आणि गुरुग्राममध्ये भूकंपाचे झटके जाणवले. हिमाचल प्रदेशातील चंबा आणि डलहौजी (dalhousie) या ठिकाणीही भूकंपाचे हादरे बसले. तसेच उत्तरप्रदेशातील नोएडा, गाजियाबाद, मथुरा, मेरठ या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले.

या भूकंपामुळे जिवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली (Earthquake in delhi) नाही. मात्र या भूकंपामुळे दिल्लीत नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. अनेक नागरिकही रस्त्यावर जमा झाले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें