AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक: वेबसाईट हॅक करून एकाच कुटुंबातल्या 16 जणांना लस दिल्याचे भासवले, मास्टरमाइंडचा शोध सुरू

केंद्रावरील लाभार्थ्यांच्या यादीत अचानक 55 वरून 71 अशी वाढ झाली. डीकेएमएम लसीकरण केंद्रावरील डाटा एंट्री ऑपरेटरच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला

धक्कादायक: वेबसाईट हॅक करून एकाच कुटुंबातल्या 16 जणांना लस दिल्याचे भासवले, मास्टरमाइंडचा शोध सुरू
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 4:18 PM
Share

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस न घेताच, लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेबसाइट हॅक केल्याच्या प्रकारामुळे औरंगाबाद महापालिकेला (Aurangabad Municipal Corporation) चांगलाच घाम फुटला आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील तब्बल 16 जणांची नावे वेबसाइटमध्ये घुसवण्यात आली आहेत. या प्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी महापालिकेने 10 सदस्यांची समिती नेमली असून पोलिसांकडूनही त्याचा शोध सुरू आहे. शहरातील बेगमपुरा पोलिस(Begampua Police Station, Aurangabad)  या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आरेफ कॉलनीतील केंद्रावरचा प्रकार

शहरातील महापालिकेच्या आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत डीकेएमएम लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. या केंद्रावर 29 ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील 16 जणांनी प्रत्यक्ष लस न घेता वेबसाइट हॅक करून त्यांची नावे घुसवण्यात आली. वास्तविक पाहता हे लोक लसीकरण केंद्रावर आलेच नाहीत. रजिस्टरवर त्यांची नावेही नाहीत. त्यांनी लस घेतल्याचे भासवले गेले. या केंद्रावरील लाभार्थ्यांच्या यादीत अचानक 55 वरून 71 अशी वाढ झाली. डीकेएमएम लसीकरण केंद्रावरील डाटा एंट्री ऑपरेटरच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महापालिकेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे.

कोविन अॅपचा यूजरनेम, पासवर्ड कोणी चोरला?

लसीकरणाचे बोगस लाभार्थी दाखवण्याकरिता घडवून आणलेल्या या प्रकारामुळे पालिका सतर्क झाली आहे. मागील दोन दिवसांपासून हे केंद्र बंद आहे. कोविन अॅपचा युजरनेम, पासवर्ड चोरून 16 नावे कोणी टाकली, त्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. या केंद्रावरील सर्व 10 कर्मचाऱ्यांची मनपाने कसून चौकशी केली. प्राथमिकरित्या त्यात कोणी दोषी आढळून आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बाहेरच्या व्यक्तीनेच कोविन अॅपचा डिव्हाईस चोरून हे कारस्थान केले असावे, असाही अंदाज मनपा अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

सिल्लोड, सोयगावात 2,3 सप्टेंबरला महालसीकरण

दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात 02, 03 सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियान राबवण्यात देण्यात येणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून आणि बजाज उद्योग समुहाच्या सहकार्यातून सिल्लोड, सोयगावात महालसीकरण अभियानात राबविण्यात येत आहे. बजाज उद्योग समुहाने सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारीतून राज्यात 6 लाख लस राज्य शासनास उपलब्ध करून दिल्या आहेत. या लस सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील विविध लसीकरण केंद्रांवर मोफत स्वरूपात देण्यात येणार आहेत. अद्याप एकाही लसचा डोस घेतला नाही, असे अठरा वर्षांवरील नागरिक यांनी लस घेण्यासाठी पुढे यावे. लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या कोविन ॲपवर नोंदणी करावी. लसीकरण केंद्रांवरही ऑन द स्पॉट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नाही, अशा नागरिकांसाठी देखील विशेष लसीकरण केंद्रांची व्यवस्था प्रशासनातर्फे केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. (Fake vaccination certificate issued to 16 people in one family by hacking website, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या:

Mumbai Fake vaccination scam | कांदिवलीत बोगस लसीकरण प्रकरण, आरोपीला बारामतीतील लॉजवरुन अटक

Vaccine Update: दुसऱ्या डोसची तारीख लक्षात आहे ना? जाणून घ्या औरंगाबादेत किती जणांचे झाले दोन्ही डोस पूर्ण

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.