Mumbai Fake vaccination scam | कांदिवलीत बोगस लसीकरण प्रकरण, आरोपीला बारामतीतील लॉजवरुन अटक

राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे

Mumbai Fake vaccination scam | कांदिवलीत बोगस लसीकरण प्रकरण, आरोपीला बारामतीतील लॉजवरुन अटक
बनावट लसीकरण प्रकरणी राजेश पांडेला बेड्या

बारामती : मुंबईत बोगस लसीकरण (Mumbai Fake vaccination scam) करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे या आरोपीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून मुंबईत नागरिकांसाठी लसीकरण केलं जातं होतं. याबरोबरच हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. (Mumbai Kandivali Fake vaccination scam accuse arrested from Baramati Lodge)

बारामतीतून आरोपीला बेड्या

राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरुन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

30 मे 2021 रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले.

या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली 12,40,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची सखोल चौकशी, 48 तासांत अहवाल सादर करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

Mumbai Fake vaccination scam : मुंबईत बनावट लसीकरण कसं घडलं, कुठे घडलं, आरोपी कोण? नांगरे पाटलांनी A टू Z सांगितलं!

(Mumbai Kandivali Fake vaccination scam accuse arrested from Baramati Lodge)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI