AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fake vaccination scam : मुंबईत बनावट लसीकरण कसं घडलं, कुठे घडलं, आरोपी कोण? नांगरे पाटलांनी A टू Z सांगितलं!

मुंबईतील बोगस लसीकरण शिबिराचा पर्दाफाश केल्यानंतर सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबई बोगस लसीकरण शिबीर आयोजित केली होती. याटोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Mumbai Fake vaccination scam : मुंबईत बनावट लसीकरण कसं घडलं, कुठे घडलं, आरोपी कोण? नांगरे पाटलांनी A टू Z सांगितलं!
Vishwas Nangare Patil
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई : मुंबईतील बोगस लसीकरण शिबिराचा (Fake vaccination scam) पर्दाफाश केल्यानंतर सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबई बोगस लसीकरण शिबीर आयोजित केली होती. याटोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संदर्भात महत्वाची माहिती देण आवश्यक होतं. यात आतापर्यंत सात गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असं नांगरे पाटील म्हणाले. (Mumbai Fake vaccination scam IPS Vishwas Nangre Patil Mumbai police talks on bogus vaccination total eight accused arrested )

या संपूर्ण गुन्ह्यांचा बारकाईने तपास होणे अपेक्षित असल्याने SIT स्थापन केली. पहिलं शिबीर हिरानंदानी येथे आयोजित केला होता. सर्वांना कोविशील्ड लस देण्यात आली. संबधित लस घेतल्याचं प्रमाणपत्र हाती आल्यानंतर जागा, वेळ या वेगवेगळ्या असल्याने रहिवाशांना संशय आला. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असं नांगरे पाटलांनी सांगितलं.

आठ आरोपींना अटक,  12 लाख जप्त

त्याचबरोबर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बनावट औषधांसदर्भातले गुन्हे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कलमे ही टाकलेली आहेत. कांदिवलीत त्या गुन्ह्यात आठ आरोपींना अटक करून 12 लाख जप्त केले आहेत. मुख्य आरोपींच्या बँकेची खाती गोठवण्यात आली आहेत.

मुंबईसह ठाण्यातही लसीकरण

शिवम हॉस्पिटलमधून हे खरे डोस गेल्याचे समोर आले असून रुग्णालयाच्या डॉक्टांवर अटकेची कारवाई केली आहे. 200 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात गुन्ह्यांनंतर सात गुन्हे नव्याने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईसह ठाण्यातही या टोळीने लसीकरण केले असून त्याबाबत माहिती ठाणे पोलिसांना दिली असून गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.

सात ठिकाणी गुन्हे दाखल

कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली, भोईवाडा, बोरिवली, बांगुरनगर अशा सात ठिकाणी गुन्हे दाखल केले असून समतानगर आणि अंधेरीतही असे प्रकार उघडकीस आले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यात महेंद्र प्रताप सिंग या नऊ कॅम्पचा मुख्य आहे. संजय गुप्ता हा सर्व गुन्ह्यात सहआरोपी आहे. राजेश पांडे हा कोकिळा बेन रुग्णालयाला सेल्सचा अधिकारी आहे. मो करीम अक्बर अली या सर्व गुन्ह्यात आरोपी असून मध्यप्रदेशचा राहणारा आहे.

शिवम रुग्णालयातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याचे प्रशिक्षण दिलं होतं. चंदन रामसागर हा डेटा सेंटरमधील कर्मचारी आहे. त्या मॅनेज करून हे सर्व काम सुरू होतं. गुडीया यादव, डाँ पटारिया यांचा सहभाग निश्चित झाला आहे. १६ हजार १०० लस मिळाल्या होत्या. आरोपींनी पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवम रुग्णालयातील काही डोस pcbc दोन टप्यात लस त्यांना मिळाले होते. खासगी डोस दिले आहेत , ते नियम पाळलेले दिसत नाहीत. आर्थिक व्यवहार झालेत, त्याचा तपास केला जातोय, अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

आम्ही आवाहन करतोय असे काही या रॅकेटमार्फत कुठे लसीकरण झालं असेल , काही शिबीर राबवले असतील त्याची माहिती आम्हाला द्या , नावं गुप्त ठेवली जातील. सध्या या टोळीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, असंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.

390 नागरिकांना लस

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृह संकुलात सुमारे 390 रहिवाशांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र, लसीकरण करणाऱया संबंधित चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. हा सर्व प्रकार संशयास्पद निर्माण करणारा असल्याने रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या संशयास्पद लसीकरण प्रकाराची चौकशी करुन 48 तासांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी उपआयुक्त (परिमंडळ 7) विश्वास शंकरवार यांना दिले होते.

संबंधित बातम्या 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची सखोल चौकशी, 48 तासांत अहवाल सादर करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.