सुसाईड नोट लिहून आख्खं कुटुंब 15 दिवसांपासून बेपत्ता

सुसाईड नोट लिहून आख्खं कुटुंब 15 दिवसांपासून बेपत्ता

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सुसाईड नोट लिहून आख्खं कुटुंबच्या कुटुंब बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज 15 दिवस झाले, तरी या कुटुंबाचा काहीच पत्ता नाही, शिवाय पोलिसही अद्याप शोध लावू शकले नाहीत.

संतोष एकनाथ शिंदे, पत्नी सविता शिंदे, मुलगा मुकुंद शिंदे, मैथिली शिंदे हे चौघेजण बेपत्ता झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, सुसाईड नोट लिहून घरातून हे चौघेही निघून गेले आहेत. हे कुटुंब गाव सोडून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र, ते नेमके कुठे गेलेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

चिंचवड स्टेशनच्या जवळच असणाऱ्या मोहननगर परिसरातील हे कुटुंब रहिवाशी आहेत. बेपत्ता शिंदे कुटुंबीयातील संतोष शिंदे यांची ओम ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी आहे. त्यांच्याकडे एकूण 10 गाड्या असल्याची माहिती मिळते आहे. शिंदे कुटुंबीयावर 2 कोटी रुपयांचे कर्ज होते, अशीही माहिती पोलिसांना सापडलेल्या डायरीतून समोर आली आहे.

पिंपरी पोलिस ठाण्यात शिंदे कुटुंबीयांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून, पिंपरी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. शिंदे कुटुंबीयांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI