7 जानेवारीला दिल्लीच्या चारही बाजूंनी निघणार ट्रॅक्टर परेड, योगेंद्र यादव यांची मोठी घोषणा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 05, 2021 | 7:14 PM

स्वराज पक्षाचे (Swaraj Party) नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनीही मोठी घोषणा केली आहे.

7 जानेवारीला दिल्लीच्या चारही बाजूंनी निघणार ट्रॅक्टर परेड, योगेंद्र यादव यांची मोठी घोषणा
Follow us

नवी दिल्ली : शेतकरी संघटनेतर्फे (Farmers Union) दिल्लीत प्रजासत्ताक दिनी (Republic Day) ट्रॅक्टर परेड आयोजित करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मोठ्या घोषणेनंतर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा संस्था सतर्क झाली आहेत. अशातच स्वराज पक्षाचे (Swaraj Party) नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनीही मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या सर्व बाजूंनी 7 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. “काल 4 तारखेला सरकारने शेतकऱ्यांशी 7 वी बैठक घेतली. यासोबत कालच कायद्याला लागू करून सात महिने पूर्ण झाले. 7 वेळा बैठक घेऊनही 7 शब्ददेखील ऐकू आले नाहीत हे खेदजनक आहे. हे तीनही कृषी-विरोधी कायदे मागे घ्यावेत. ” असं यावेळी योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. (farmers organization will takeout tractor parade from all around delhi on 7th january)

ते पुढे म्हणाले की, “खरोखर कायदा रद्द करायचा असेल तर आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करा. आधी आमची योजना सहा तारखेसाठी होती, पण आता 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ट्रॅक्टर मार्च काढला जाईल. ” योगेंद्र यादव यांच्या या घोषणेमुळे दिल्ली पोलिसांचा भार वाढणार आहे. यासाठी आतापासून पोलीस पथकं कामाला लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार’

केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन करा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, असं आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडावा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा राजधर्म पाळणं म्हणजे या आंदोलनात बळी गेलेल्यांना खरी श्रद्धांजली असेल, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अहंकारी सरकार सत्तेत आलं आहे. शेतकऱ्यांच्या वेदनाही हे सरकार समजून घेण्यास तयार नाही तिथे सामान्य जनतेची काय बिशाद? कृषी विधेयकाला सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत 50 शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्यातील काही जणांनी सरकारविरोधातील संतापातून आत्महत्या केली आहे, तर काहीचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (farmers organization will takeout tractor parade from all around delhi on 7th january)

संबंधित बातम्या – 

देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला, अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

अनेक कंपन्या आणि हॉटेलची मालकी; रॉबर्ट वाड्रांची संपत्ती ऐकाल तर चक्रावून जाल!

(farmers organization will takeout tractor parade from all around delhi on 7th january)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI