नागपुरात कौटुंबिक कलाहातून निर्दयी बापाकडून 9 महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या

या पित्याने आपल्या 9 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर बॉटलच्या काचेने वार करत आत्महत्येचा प्रयत्नही केला.

नागपुरात कौटुंबिक कलाहातून निर्दयी बापाकडून 9 महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या
| Updated on: Jul 17, 2020 | 12:23 AM

नागपूर : नागपुरात एका निर्दयी पित्याने आपल्या 9 महिन्याच्या (Father Murder 9 Months Old Daughter) चिमुकलीची हत्या केली आहे. या पित्याने आपल्या 9 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर बॉटलच्या काचेने वार करत आत्महत्येचा प्रयत्नही केला. कौटुंबिक वादातून हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे (Father Murder 9 Months Old Daughter).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

ज्या पित्याने जन्म दिला त्याच पित्याने आपल्या 9 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडविल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वतः सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला. बॉटलच्या काचेने स्वतःच्या गळ्यावर वार करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पिता गंभीर जखमी झाला. त्यांच्या वडिलांना माहिती मिळताच त्यांनी त्याला रुग्णालयात पोहोचविले. सध्या या पित्यावर उपचार सुरु आहेत. सक्करदार पोलीस स्टेशन हद्दीतीलतील भांडे प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे.

मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या पित्याचं नाव सोनू शेख आहे. तो वाहन चालक आहे. तर 9 महिन्याच्या मृत मुलीचं नाव अलविना शेख आहे. या घटने मागे कौटुंबिक वादच आहे की आणखी काय याचा तपास पोलीस करत आहे. या घटने मुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

Father Murder 9 Months Old Daughter

संबंधित बातम्या :

चोरट्यांनाही कोरोनाची धास्ती, पुण्यात मास्क लावून चोरी करणाऱ्या दोघांना अटक

शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या

चार वर्षांच्या अफेअरनंतर विवाह, तीन दिवसात पतीची ट्रेनखाली उडी, पत्नीचाही गळफास