AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूट्यूबर विजेता एल्विश यादववर गंभीर आरोप, एफआयआर दाखल; नेमकं काय घडलं?

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एल्विशविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे एल्विशच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच एल्विशवर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

यूट्यूबर विजेता एल्विश यादववर गंभीर आरोप, एफआयआर दाखल; नेमकं काय घडलं?
| Updated on: Jan 29, 2025 | 3:01 PM
Share

एल्विश यादवसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोएडा रेव्ह पार्टी प्रकरणातल्या साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी एल्विशविरोधात FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवचे नाव सतत वादात राहताना दिसत आहे. बिग बॉस 18 मध्ये, त्याने मीडियाला पेड म्हटल्याने तो खूप ट्रोल झाला होता.

 रेव्ह पार्टीत सापांचं विष पुरवल्याचा आरोप

एवढच नाही तर, काही दिवसांपूर्वी रेव्ह पार्टीत सापांचं विष पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. आता या रेव्ह पार्टीमधल्या साक्षीदाराला धमकावल्याबद्दल एल्विश यादवविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे

पीपल फॉर ॲनिमल्सचा कार्यकर्ता आणि रेव्ह पार्टी प्रकरणातला साक्षीदार सौरभ गुप्ताने एल्विशविरोधात एफआयआर दाखल केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार गाझियाबादमधील नंदग्राम पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सौरभचे एल्विशवर गंभीर आरो

‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सौरभने एल्विश यादववर गंभीर आरोप केले आहेत. सौरभने सांगितले की, एल्विश यादव त्याच्या कारमध्ये त्याच्या मागे त्याच्या सोसायटीपर्यंत आला आणि त्याला धमक्या देऊ लागला. सौरभच्या म्हणण्यानुसार, एल्विशने खोटी ओळख देऊन सोसायटीत प्रवेश केला.

सौरभने असंही म्हटलं आहे की, एल्विश यादवने सौरभ आणि त्याच्या भावाला अपघाताच्या स्वरुपात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच याशिवाय सौरभने एल्विश आणि त्याच्या साथीदारांवर सौरभ आणि त्याच्या कुटुंबाविषयी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला आहे.

नोएडा पोलिसांसोबतचे काही व्हिडिओ व्हायरल 

सौरभने सांगितलं की, त्याचे आणि गौरवचे नोएडा पोलिसांसोबतचे काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहे. एल्विशच्या विरोधात कट रचतोय, असं या व्हिडिओद्वारे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सौरभला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सौरभला त्याचं फेसबुक अकाउंटही बंद करावं लागलं.

सौरभने पोलिसांकडे तक्रार करताना एल्विशचा एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये एल्विशने सौरभ गुप्ताचं अपहरण करण्याची आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं दिसत आहे.

याच सर्व आरोपांमुळे एल्विशविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींनंतर पोलीस आता एल्विश यादववर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.