Anurag Kashyap | अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा, अटकेची टांगती तलवार

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर अनुराग कश्यपविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anurag Kashyap | अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा, अटकेची टांगती तलवार

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर अनुरागविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने मंगळवारी अनुरागविरोधात वर्सोवा पोलिसात तक्रार दाखल केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आजच अनुराग कश्यपला अटक करण्याची शक्यता आहे. (FIR launched against Director Anurag Kashyap at Versova Police station)

पीडित अभिनेत्रीने मंगळवारी वकील नितीन सातपुते यांच्यासह पोलीस स्टेशन गाठत अनुरागच्या अटकेची मागणी केली. ‘अनुराग कश्यपवर बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, सोमवारी रात्री अभिनेत्री पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाली होती. मात्र महिला पोलीस अधिकारी नसल्यामुळे ती तक्रार नोंदवू शकली नव्हती’, अशी माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी यावेळी दिली.

अभिनेत्रीचे आरोप 

पीडित अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अनुरागने माझ्यासोबत अतिप्रसंग केला असून तो माझ्याशी अतिशय वाईट वागला, असे तिने आपल्या आरोपात म्हटले आहे. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

अनुराग कश्यपने 2014 मध्ये माझ्यासोबत छेडछाड केली होती. ज्या मुली माझ्यासोबत काम करतात, त्यांच्यासोबत मी ‘गाला टाईम’ घालवतो, असे अनुरागने सांगितले असल्याचे ती म्हणाली. “त्यावेळी अनुरागच्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे काम सुरु होते. रणबीर कपूरसोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी मुली त्याच्यासोबत शय्यासोबत करण्यास तयार होत्या, असेही त्याने म्हटले. यानंतर त्याने एक अडल्ट चित्रपट पाहण्यास सुरुवात केली. तो अचानक निर्वस्त्र झाला आणि मलाही कपडे काढण्यास सांगू लागला. त्यावेळी मी खूप घाबरले. मी आजारी असल्याचे कारण देऊन कसाबसा तिथून पळ काढला” असे अभिनेत्रीने म्हटले होते.

अनुराग कश्यपने आरोप फेटाळले

अभिनेत्रीने केलेले आरोप अनुरागने फेटाळून लावले आहेत. तसेच त्याने तिला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे. अनुरागने अनेक ट्विट करत तिच्यावर हल्लाबोल केला. या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अनुरागच्या समर्थनात पुढे आल्या. इतकेच नव्हे तर, अनुरागच्या दोन्हीही घटस्फोटित पत्नींनी अनुरागला पाठिंबा दिला आहे. (FIR launched against Director Anurag Kashyap at Versova Police station)

‘मला गप्प बसवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहेत. स्वतः एक स्त्री असताना, खोटे बोलण्यात दुसऱ्या महिलेलाही सहभागी करुन घेतले. थोडी तरी मर्यादा बाळगा. या सगळ्यात मी इतकेच म्हणेन की हे सगळे आरोप निराधार आहेत. मी असे कधी वागत नाही आणि इतरांनी असे वागलेले खपवून घेत नाही’, अशा आशयाचे ट्विट करत त्याने आरोपांचे खंडन केले आहे.

संबंधित बातम्या :

‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर

#Metooच्या आरोपानंतर राधिका, तापसीचा अनुराग कश्यपला पाठिंबा

(FIR launched against Director Anurag Kashyap at Versova Police station)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI