जनता कर्फ्यूदरम्यान क्रिकेट खेळणं महागात, कल्याणमध्ये 9 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज (22 मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Cricket Player Fir register)  म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे.

जनता कर्फ्यूदरम्यान क्रिकेट खेळणं महागात, कल्याणमध्ये 9 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज (22 मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Cricket Player Fir register)  म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. जनता कर्फ्यूदरम्यान कल्याणमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील काळा तलाव (Janta Curfew Cricket Player Fir register)   या ठिकाणी जनता कर्फ्यू दरम्यान काही जण क्रिकेट खेळत होते. जनता कर्फ्यूदरम्यान सर्व नागरिकांना घरात राहा अशा सूचना दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या 9  जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

या सर्वांवर भादवी 128, 269, 270, 290 मुंबई पोलीस एक्ट 37(3)135, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सण 2005 चे कलम 51 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण देशात कोरोना विरोधात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. देशासह राज्यातील मोठी शहरं ते ग्रामीण भागातही सर्व नागरिक हा कर्फ्यू त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून पाळत आहेत. राज्यातील प्रत्येक रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे.

कोरोनाला हरवायचं असेल, इतरांशी संपर्क टाळणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, अत्यावश्यक सुविधा पुरवणारे सोडता इतर सर्व नागरिकांनी स्वत:ला एका दिवसासाठी क्वारंटाईन केलं आहे.

आज जनता कर्फ्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना टाळं असणार (Janta Curfew Cricket Player Fir register)   आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI